Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

प्लेग,मिलिबग रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्याने डाळींब बाग तोडली

डाळींब माल बाजारात विक्री न झाल्याने शेतकऱ्यांनी घेतला निर्णय


करमाड प्रतिनिधी :- औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा येथील शिवरासह परिसरात प्लेग रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्याने    शेतकरी हावादील झाले आहेत.  सतत दुष्काळाचा सामना करत दुष्काळ परिस्थितीवर मात करून उभी केलेली डाळिंब  दोन पैसे देण्याच्या परिस्थितीत असताना आशा रोगाच्या  थैमानाने वाया जात असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहे. 
भांबर्डा (ता.औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून परिसरात ओळख असलेले बळीराम पंडितराव काळे यांच्या भांबर्डा येथील गट क्रमांक ९६ मधील डाळिंब बागेला दोन वर्षापासून फळेचे नुकसानीमुळे योग्य भाव आणि रोगाच्या प्रादुर्भावाने माल व्यापारी घेण्यास नकार त्यात पिकाची नापिकीचे संकटाला कंटाळून  १० वर्षाच्या उभा असलेला डाळींब बागेत जेसीबी घालून बाग उखडून टाकली आहे. हे करत असतांना त्यांचे मन गहिवरले आणि डोळ्यांतील पाणीखाली आले. पोटच्या पोरासारखे जीव लावून उभी केलेली डाळींब बाग याच डोळ्या देखत उखडून टाकावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.    भांबर्डा परिसरात प्लेग आणि मिलिबग(पिढ्या ढेकूण) रोगाने घातलेला थैमान मागील वर्षी त्यांनी या रोगावर मात करण्यासाठी अनेक लाखो रुपयाची औषधी फवारणी करून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र तेही अपयशी ठरले. यावर्षीही अगोदर बागेवर या रोगाची लक्षणे दिसून आली नव्हती मात्र त्यांनी लाखा पेक्षा जास्त खर्च करून डाळिंब बागेत फळ लागेपर्यंत  प्रयत्न केला मात्र फळे चांगल्या प्रकारात भरल्यानंतर अचानक पुन्हा या रोगाने फळांवर थैमान घातले त्यामुळे बागेतील फळांना काळे डाग पडून फळाची झाडावरून गळ सुरुवात झाली दररोज कित्येक कॅरेट माल जमिनीवर पडत असल्याकारणाने ते हवालदिल झाले. त्यानी मालाचे दोन पैसे करावे म्हणून विक्रीसाठी तोडला तर त्यालाही व्यापारी खरेदी करण्यास तयार नसल्याचे प्रकार समोर आला. लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी संख्या कमी असल्याने माल विक्री न झाल्याने त्या शेतकऱ्यांला तोडलेले डाळींब शेवटी रस्त्यावर फेकून द्यावे लागले. लाखो रुपये खर्च करून उभी केलेली बाग लाखो रुपयाचे खते औषधी फवारणी केल्यानंतरही हाती मात्र काहीच न आल्याने त्याचा पुर्ण खर्चही यावर्षी वाया गेला आहे.  एकंदरीत या शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत पाच वर्ष पाठीमागे याच बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न काढले होते मात्र प्लेग व मिलिबग सारख्या रोगा प्रादुर्भावमुळे प्रगतिशील शेतकरी ही हवादिल होऊ शकतो ही या घटनेने दाखवून दिले आहे. त्यांनी या अगोदर घेतलेल्या डाळींब बागेच्या एकरी उत्पन्नाचे किस्सेही अनेकांना माहीत असल्याने ते आदर्श होते मात्र त्यांच्या या बागेवर पसरलेल्या प्लेग आणि मिलिबग रोगाची थैमानाने पोटच्या पोरासारखी उभी केलेल्या डाळिंब बागेवर जेसीपी घालण्याचा त्यांच्यावर योग आल्याने त्यांचे डोळे पाणावले होते. याच्या सारख्या परिसरात अनेक फळबागा याच रोगाच्या प्रादुर्भावाने वेढलेला असल्याने प्रशासनाने तत्काळ परिसरात फ्लबागेचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close