पोलीस उपनिरीक्षकाची चोरीला गेलेली चार चाकी मिळाली मुद्देमालासह पांच आरोपी ताब्यात

mh20live Network
कन्नड / कल्याण पाटील
चोरट्यांनी धाडस दाखविताना चक्क पोलीस उपनिरीक्षकाची व त्यांच्या नातेवाईकांची अशी दोन चारचाकी वाहने कन्नड शहरातून चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री घटली. सदर प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कन्नड शहर पोलीस यांनी विविध पथके स्थापन करून चार आरोपी सह मुद्देमाल जप्त करण्यात यशस्वी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की देऊळगाव राजा येथील पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले हे दि 21 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मावशी कमलबाई देशमुख यांच्याकडे आले होते मावशीच्या घरासमोर भोसले यांनी स्विप्ट कार क्र एम एच २१ ए एक्स ३००४ ही कन्नड एल आय ऑफिस च्या पार्किंग मध्ये लावली असता तसेच मावशीचा मुलगा नितीन देशमुख यांची स्विप्ट कार क्र एम एच २० डी जे ६४८८ या दोन्ही गाड्या पार्किंग मध्ये लावलेल्या होत्या त्या मध्यरात्री अज्ञातांनी चोरून नेल्या यात चोरट्यांनी दोन चारचाकीव रोख ५० हजार असा एकूण १४ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. उपनिरीक्षक महेश भोसले यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशानुसार कन्नड शहर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सी सी टिव्ही फुटेज ची पडताळणी करून तांत्रिक विश्लेषण केले गुप्त बतमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा शेख दाऊत शेख मजूर राहणार धाड जी बुलढाणा याने व त्याच्या मुलाने इतर साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी चिखली जी बुलढाणा येथे शोध घेतला असता रोहिदास नगर येथे असल्याची माहिती मिळाल्याने या भागातून आरोपी शेख दाऊत शेख मंजूर वय ५५ , शेख नदीम शेख दाऊत वय २२ , शेख जिशांत शेख दाऊत वय २८ रा धाड जी बुलढाणा , सखाराम भानुदास मोरे वय ३१ रा निरोडा जी जालना , दीपक दिगंबर मोरे वय २० रा निरंखेड जी जालना असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन दोन चार चाकी व दुचाकी ताब्यात घेतले दोन्ही स्विप्ट कार चोरून आणल्याची कबुली आरोपींनी दिली तसेच सेलू जी परभणी येथील २०२० मध्ये चोरीला गेलेली स्विप्ट व एक दुचाकी सात मोबाईल हँडसेट असे एकूण १९ लाख २४ हजार किमतीचा माल जप्त केला आहे या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भगवान फुंदे , पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळुंके , पोलीस कर्मचारी संजय काळे , दीपेश नागझरे , श्रीमंत भालेराव , संजय भोसले , नरेंद्र दार , रामेश्वर धापसे , योगेश करमाळे यांनी परिश्रम घेतले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे करीत आहेत .