Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

भोकरदन दुचाकी चोरी प्रकारणात पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले

दुचाकी चोरी प्रकारणात पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले

भोकरदन /सुरेश गिराम दुचाकी चोरी प्रकारणात भोकरदन पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले असून. तपासात आणखी सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. दुचाकी चोरांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुचाकी चोरी प्रकारणी बुधवारी पोला पोलिसांनी दि.9 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथून भोकरदन शहरातील किशोर गाडेकर, कृष्णा सहाणे, शरद जाधव, तिघे जणांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचे इतर दोन साथीदार कृष्णा जाधव, (रा. लिंगेवाडी )व आदिनाथ कैलास चोरमारे रा. चोरमारे वाडी, यांना शनिवारी दि.12 डिसेंबर रोजी रात्री भोकरदन शहरातील एका गॅरेज मधून ताब्यात घेण्यात आले. तर तपासात आणखी सात दुचाक्या मिळून आल्या. असून त्या औरंगाबाद, सिल्लोड, लिंगेवाडी, कोपरडा आदि ठिकाणाहून जप्त करण्यात आल्या असल्याचे पोलीस निरीक्षक चत्रभूज काकडे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, रविश भोपळे, एन. एस. जाधव, एस. के. लोखंडे, समाधान जगताप, यांनी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close