Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार – शरद पवार

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकासह  काढून ठेवलेल्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गुरे ढोरे व घरे पडून घरातील संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ व रोगराई यामुळे  जे नुकसान होते ते वर्षभरासाठी होत असते. मात्र या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांबरोबरच शेतातील माती देखील वाहून गेलेली  असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा शेती वाहीत करण्यासाठी किमान पाच ते सात वर्षे लागतील.

उस्मानाबाद : राज्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. याचा दीर्घकाळ परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.
मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे उद्धवस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पवार बोलत होते.


पवार पुढे म्हणाले की, अतिवृष्टीचा पाऊस म्हणजे दीर्घ परिणाम करणारे हे संकट आहे. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत शेतकऱ्यांमध्ये आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांमध्ये ताकत नसते, तेव्हा सरकारला ताकत उभी करावी लागते. हीच ताकद आम्ही शेतकऱ्यांमागे उभा करू, असे आश्वासन पवारांनी शेतकऱ्यांना दिले आहे. तसेच पवार पुढे म्हणाले, केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे. राज्याना काही मर्यादा आहेत. भूकंपाच्या वेळी मी काही दिवस या भागात फिरत होतो. त्यावेळी पैसे उभे केले. जागतिक बँकेतून पैसे आणले. महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा मदत केली. त्यावेळी मी करू शकलो. आत्ता त्या संकटाला राज्य सरकारची एकट्याची ताकत आहे, असे मला वाटत नाही, असे पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या या भागात पहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्याशी मी जाऊन बोलेन. त्यांची मनापासून इच्छा आहे की लोकांना काहीही करून मदत केली पाहिजे. मदत करायची त्यांची तयारी आहे. तरी एक मर्यादा आहे, त्यामुळे केंद्राची मदत घ्यावी लागेल. याबाबत येत्या दहा दिवसात पंतप्रधानांना भेटू महाराष्ट्राला मदत केली पाहिजे, हा आग्रह धरू, असे पवार म्हणाले.

आश्वासन देऊन ते म्हणाले की, भूकंपाच्या वेळी हजारो माणसे गेली त्या संकटावर  आपण मात केली आहे. तशीच मात या संकटावर ही  करा असे भावनिक आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

यावेळी जीवनराव गोरे म्हणाले की, भूकंपावेळी ज्याप्रकारे आपले पुनर्वसन केले त्याच धरतीवर यावेळी शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच जलसंधारणाचे बांध वाहून गेल्यामुळे त्यासाठी विशेष निधी द्यावा शेती वाहून गेल्यामुळे ते दुरूस्त करण्यासाठी विशेष निधी दयावा, आमदार चौगुले म्हणाले की शेतकर्‍यांना जीवदान देण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकासह  काढून ठेवलेल्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गुरे ढोरे व घरे पडून घरातील संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ व रोगराई यामुळे  जे नुकसान होते ते वर्षभरासाठी होत असते. मात्र या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांबरोबरच शेतातील माती देखील वाहून गेलेली  असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा शेती वाहीत करण्यासाठी किमान पाच ते सात वर्षे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आपत्ती असून अशा वाईट व अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी धीर धरावा. आम्ही निश्चित शेतकऱ्यांना व गावांना उभे करण्यासाठी धोरण ठरवून त्यांना नक्कीच मदत मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यामातून प्रयत्न करू असे प्रतिपादन  माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना संबोधित करताना केले.

 यावेळी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा नदी पात्रात नुकसान झालेल्या शेतीची व पिकांची तर सास्तूर चौक, लोहारा व लोहारा खुर्द,माकणी, सास्तुर शिवार, एकोंडी (लो), राजेगाव, कवठा (खु), औसा तालुक्यातील आशिव, उजनी व उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा व करजखेडा या ठिकाणी नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी व शेतकऱ्यांशी नुकसानीबाबत संवाद साधत त्यांची निवेदने देऊन त्यांना धीर दिला.

पाहणी दौऱ्यानंतर खा.शरद पवार यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली त्यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. विक्रम काळे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, माजी आ. राहुल मोटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले की, मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात 200, तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले.

     तसेच जिल्ह्यातील 223 बंधाऱ्या पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेली असून 84 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close