Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

शेतकर्यानसाठी खुषखबर : माननीय अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला येईल PM किसान सन्माननिधी चा सातवा हप्ता

mh20live Network

दिल्ली:देशातील करोडो शेतकरी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पी एम किसान सन्मान योजनेचा सातवा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत, परंतु आतापर्यंत खात्यात पैसे जमा झाले नाहीत. परंतु आता लवकरच हा प्रतीक्षा काळ संपणार असून पी एम किसान सन्मान निधी चा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जाईल याबाबतची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश मधील महासंमेलन यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात एम किसान योजना चा सातवा हप्ता ट्रान्सफर करणे सुरू करण्यात येईल.

पी एम किसान योजनेचा सातवा हप्ता आणि या वर्षाचा तिसरा हप्ता डिसेंबरपासून येणार होता. परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा पोहोचला नाही. परंतु पंतप्रधानांच्या आत्ताच्या विधानावरून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी साठी अर्ज केला असेल, तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती घर बसून पाहू शकता. केंद्र सरकार द्वारा भारतातील लहान शेतकरी जे इन्कम टॅक्स पे करीत नाहीत, अशा शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत वर्षातून तीन टप्प्यांत घेतली जाते. जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी यादी मध्ये सहभागी आहात, तर तुम्ही तुमचे बँक खाते चेक करू शकता.

बँक अकाउंट स्टेटस मध्ये FTO is generated and payment confitmation is pending असे दिसले काय समजायचे की, तुमची कागदपत्रे तपासण्यात आले आहे आणि लवकरच योजनेचा सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाईल. याबरोबरच तुमची स्टेटस चेक केल्यानंतर Rft signed by state असं वाक्य दिसू शकत. जर तुम्हाला ही समस्या येत असेल तर गरज नाही घाबरून जाण्याची. Rft चा अर्थ होतो रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर म्हणजेच लाभार्थ्याच्या डाटा तपासण्यात आला आहे आणि तुमचे रिक्वेस्ट प्रोसेस साठी ट्रान्सफर केले गेली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close