Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

प्रधानमंत्री किसान योजनेचा ‘सातवा’ हप्ता कधी येणार? कशी करायची घरबसल्या नोंदणी? वाचा सविस्तर-

नवी दिल्ली | शेतकर्यांना पण ईतर उद्योजक, कामगार यांच्या प्रमाणे मंदत व्होवी साठी केद्रशासाने प्रधानमंत्री किसना केली या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना मंदत करत आसते

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन समान हप्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रूपये जमा होत आहेत. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हप्त्यांचे पैसे वाटप केले असून देशातील जवळपास साडेदहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

PM Kisan योजनेत घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून नोंदणी कशी करायची, आधार अपडेट, नावातील चुका कशा दुरूस्त करायच्या हे जाणून घेण्यासाठी या बातमीच्या शेवटी सविस्तर माहिती दिली आहे.
आत्ता शेतकरी वर्गात पुढील हप्त्याची उत्सुकता असून PM किसान योजनेचा सातवा हप्ता कधी येणार याकडे देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाचवा आणि सहावा हप्ता लवकर दिल्याने आता सातवा हप्ताही लवकर मिळेल अशी शेतकरी वर्गाला आशा आहे. वर्षभरातील हप्त्यांचे नियोजन पाहता सातवा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्चच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाण्याची शक्यता आहे. शक्यतो डिसेंबर महिन्याच्या कालावधीत सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल असेही सांगितले जात असले तरी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता डिसेंबर ते मार्चपर्यंत केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पाठवले जातील.

सध्या पीएम किसान योजनेचा गैरवापर करत काही राज्यांमध्ये बोगस लाभार्थ्यांनाही लाभ दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची पुनर्पडताळणी मोहिम देखील हाती घेतली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी देखील राज्य सरकारना आदेश देण्यात आले आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली असून शेतकरी स्वतःची नोंदणी स्वतः करू शकणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नवर स्वतःची नोंदणी स्वतः करता येणार आहे.

अशी करा घरबसल्या मोबाईलवरून नोंदणी –
पीएम किसान वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘Farmers Corner’ निवडा.
‘नवीन शेतकरी नोंदणी’वर क्लिक करा.
एक नवीन टॅब उघडली जाईल.
येथे आपला आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका, ‘Click here to continue’वर क्लिक करा’.
त्यानंतर आपल्या नोंदणीसाठी फॉर्म उघडेल.
याठिकाणी जमिनीची माहिती देण्यासाठी सर्वे नंबर, खाते नंबर, खसरा क्रमांक आणि जमिनीचे क्षेत्र याची माहिती भरा
यानंतर ‘Save’ वर क्लिक करा, अशा प्रकारे घरबसल्या तुमची तुमची नोंदणी पूर्ण करा.
फार्मर्स कॉर्नरवर शेतकऱ्यांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा –
नवीन नोंदणी – https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx
आधार अपडेट – https://pmkisan.gov.in/UpdateAadharNoByFarmer.aspx
लाभार्थी स्थिती – https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx
लाभार्थी यादी – https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
स्वत: नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती – https://pmkisan.gov.in/FarmerStatus.aspx
स्वतः नोंदणी केलेल्यांसाठी चुकांची दुरूस्ती – https://pmkisan.gov.in/SearchSelfRegisterfarmerDetails.aspx
किसान क्रेडीट कार्ड साठी नोंदणी फॉर्म – https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close