Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

PM KISAN: नियम बदलले! 6000 रुपये पाहिजेत, तर करा ‘हे’ काम, अन्यथा…

नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा फायदा घेत असल्यास आपल्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान किसान निधीच्या नियमांमध्ये (PM Kisan Rule Change) मोदी सरकारने मोठे बदल केले आहेत. ज्या शेतकर्‍यांच्या नावावर शेती आहे, त्यांनाच आता फक्त 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक प्रकारच्या चुका समोर आल्यात, ज्यावरून सरकारने सरसकट निधीचा लाभ देणं थांबविण्याचा मोठा निर्णय घेतलाय. (pm kisan samman nidhi rules change see now who can get the benefits of this scheme)

आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला नावावर शेतजमीन करून घ्यावी लागणार आहे. अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांनी त्यांच्या नावावर शेतजमीन केलेली नाही. या नवीन नियमाचा परिणाम योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवर होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. म्हणजेच नवीन नियम नोंदणी करणाऱ्यांना हा नियम लागू होईल.

काय झालाय बदल?

नवीन नोंदणी घेत असलेल्या अर्जदारांना आतापासून अर्जांच्या जागेचा भूखंड क्रमांक द्यावा लागेल. ज्या लोकांचे संयुक्त कुटुंब आहे, त्यांना त्यांच्या मालकीची जमीन त्यांच्या नावावर करून घ्यावी लागेल. तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर शेतकर्‍यांनी जमीन विकत घेतली असेल, तर त्यात कोणतीही अडचण येणार नाही.

या लोकांना फायदा मिळत नाही

जर एखादा शेतकरी शेती करतो, पण शेतात त्याच्या नावावर आणि वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर जमीन नसेल तर त्याला वर्षाकाठीस 6000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. जमीन शेतकऱ्याच्या नावे असावी लागेल. एखादा शेतकरी दुसर्‍या शेतकर्‍याकडून भाड्याने जमीन घेतल्यास त्यालाही योजनेचा लाभ मिळणार नाही. पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांच्या नावावर जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे. जर शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पदावर असेल तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही. 10000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन असणाऱ्या सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार नाही.

पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे काय?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. सरकारचे उद्दिष्ट हे आहे की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे, म्हणून केंद्र सरकार पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करते. सरकार एका वर्षामध्ये तीन हप्त्यात हे सहा हजार रुपये देते. एक हप्ता 4 महिन्यांत येतो. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात.

अशा प्रकारे खात्यात पैसे ट्रान्सफर होतात

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो, त्यानंतर ते अर्ज राज्य सरकार, तुमच्या महसुलाची नोंद, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक पडताळणी केला जातो. राज्य सरकार आपल्या खात्याची पडताळणी करेपर्यंत पैसे येत नाहीत. राज्य सरकार पडताळणी करताच एफटीओ तयार होते, त्यानंतर केंद्र सरकार ही रक्कम खात्यात वर्ग करते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close