Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

उन्हाळी तिळ लागवड व्‍यवस्‍थापन

तिळाचा मुख्य उपयोग खाद्यतेंल तयार करण्यासाठी केला जातो. तिळामध्ये तेलाचे ५० टक्के आणि
प्रथिनांचे २५ टक्के प्रमाण असून तेलामधे ज्वलनविरोधक घटक सिसमोल, सिसॅंमोलीन आहेत. तेल
दीर्घकाळ चांगले टिकते, खवट होत नाही, पेंडीत प्रथिने ३५ ते ४५ टक्के असतात तसेच कॅल्शियम,
फॉस्फरसचे चांगले प्रमाण, पशू व कोंबडीसाठी पेंड उत्तम खाद्य म्हणूनही वापर होतो. तिळात कॅल्शियम
आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे.
हवामान
तिळ या पिकाची फुले, फळधारणेसाठी २६ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानात चांगली वाढ होते. चांगल्या
उगवणीसाठी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस; तर पिकांच्या कायिक वाढीसाठी २५ ते २७ अंश
सेल्सिअस तापमान लागते. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास फुलगळ होण्याची शक्यता
असते.
जमिन
तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक
असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी. त्यासाठी काडीकचरा वेचून उभी-आडवी वखरणी
करावी, जमीन तयार करताना चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. रेताळ व विम्लयुक्त जमीन सोडल्यास
पाण्याचा उत्तम निचरा होणा-या सर्व प्रकारच्या जमिनीत तिळाचे पिक घेता येते. वाळूमिश्रित पोयट्याच्या
जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पिकाची चांगली वाढ होते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ इतका
असावा. निचरा न होणाऱ्या पाणथळ जमिनीत तिळाचे पीक चांगले वाढत नाही.
बियाणे व पेरणी
वाणाची निवड: उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि
एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-१०१ :-  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने
प्रसारित केलेली एकेटी-१०१ जात ९० ते ९५ दिवसांत पक्व होते. दाण्याचा रंग पांढरा असतो. प्रतिहेक्‍टरी
७.५ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते. त्याशिवाय फुले-०१,पंजाब-०१, अकेटी-६४ – करपा रोगास प्रतिकारक
, जेएलटी-७ (तापी) वाणाचा वापर करावा

बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम तसेच चार ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो
याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यामुळे जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांना आळा बसतो, तसेच बियाण्याची
उगवण चांगली होते.
पेरणी: जानेवारीचा दुसरा आठवडा ते फेब्रुवारीच्या दुसरा आठवड्यापर्यंत पेरणी करावी. पेरणीसाठी उत्तम
प्रतीचे २.५ ते ३ किलो प्रतिहेक्‍टरी बियाणे वापरून पेरणी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर पाभरीने
करावी. पाभरीने पेरणी करत असताना बारीक वाळू किंवा चाळून घेतलेले गांडूळखत किंवा शेणखतात
मिसळून पेरल्याने बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होऊन एकसारख्या प्रमाणात पडते. पेरणी ४५ सें.मी.
अंतरावर असल्यास विरळणी ओळीतील दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून करावी.
आंतरमशागत: पेरणीनंतर ७ ते ८ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली व ८
दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपांत १५ सें.मी. अंतर ठेवावे. आवश्यकतेनुसार २ ते १ कोळपण्या
देऊन २ ते ३ वेळा निंदनी करून शेत स्वच्छ ठेवावे. विरळणी पेरणीनंतर २१ दिवसांनी करावी. २.५
सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो म्हणून योग्य ती काळजी घ्यावी.
पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी
दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या देऊन व
निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी
घ्यावी.
खत व्‍यवस्‍थापन:
माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळेस प्रति हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे. नत्राचा
दुसरा हप्ता 12.5 किलो पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. कमतरता असल्यास पेरणीच्या वेळेस तज्ज्ञांच्या
शिफारशीनुसार झिंक व सल्फरच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्याव्यात. २ टक्के यूरियाची
फवारणी पिक फुलोरयात असताना आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना.
पाणी व्‍यवस्‍थापन: उन्हाळी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर
जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या
भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. . मात्र अति पाणीपुरवठा हा वजनात उतार, तेलात घट व
विविध बुरशीजन्य रोगासकारणीभूत ठरतो .

अ) कीड वर्णन व नुकसानीचा प्रकार व्यवस्थापन / उपाय

तुडतुडे

तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूस राहून
रसशोषण करतात व पणगुच्छ रोगाचा प्रसार

करतात

क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि.
प्रतिलिटर पाण्यात मिसळून पिकावर
फवारणी करावी.

पाने – गुंडाळणारी
/ खाणारी / बोंड्या
पोखरणारी अळी

अळी हिरवट फिक्कट रंगाची असून पाठीवर ठिपके
व राठ केस असतात. अळी पानाची गुंडाळी करून
त्यात राहते. कोवळी पाने व फुले खाते व बोंडात

शिरून बी खाते.

पेरणी वेळेवर करावी. क्विनॉलफॉस (२५ टक्के
प्रवाही) २ मि.लि.
या किटकनाशकाची प्रतिलिटर पाण्यात
मिसळून पिकावर फवारणी करावी.
ब) रोग वर्णन व नुकसानीचा प्रकार नियंत्रण / उपाय
मर रोगाचा प्रसार जमिनीमुळे व दूषित बियाण्यांमुळे
होतो. जमिनीतून उद्भवतो.

बीज प्रक्रिया थायरम ३ ग्रॅम  प्रतिकिलो

बियाणे

खोड / मूळ
कुजव्या

 खोडावर जमिनीलगत काळे ठिपके पडून ते
शेंड्याकडे वाढतात व झाड वाळते.

ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रतिकिलो या
प्रमाणात बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया

करावी.

अणुजीवी ठिपके व
कडा करपा

पानावर लहान – मोठे पांढरे चट्टे दिसतात. नंतर
खोडावर पसरतात व झाड वाळते.

मॅंकोझेब २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसीन ०.६ ग्रॅम
प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी

करावी.

भुरी रोग पानांवर व खोडावर पांढऱ्या पावडर सारख्या
पदार्थाचे आवरण आढळते. पान गळून पडतात.

विद्राव्य गंधक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.

पीक पक्वता  व काढणी
ज्यावेळी पानांचा रंग पिवळा होऊन पाने गळू लागतात, बोंडाचा रंग पिवळसर होतो त्या वेळी पीक
काष्ठ्ठणीस योग्य आहे. असे समजावे. काढणीस उशीर झाल्यास उन्हामुळे बोंडे फुठून तीळ गळून पडण्याचा
संभव असतो. तर काढणी लवकर झाल्यास दाणे बारीक व कापलेल्या झाडांच्या पेंढ्या उभ्या करून
ठेवाव्यात. तीळ चांगले वाळल्यानंतर पेंढ्या कापडावर किंवा ताडपत्रीवर उलट्या करून झटकून तीळ
वेगळे करावेत व उन्हात नीट वाळवून नंतर त्याची साठवणूक करावी. उत्पादन : सलग पिकाचे दर हेक्टरी
उत्पादन जमिनीच्या मगदुराप्रमाणे व जातीनुसार ६ ते ७ क्विंटल  प्रती हेक्टर येते.

भारतातील लोकांचे सरासरी तेल खाण्याचे प्रमाण इतर देशांच्या मानाने मात्र कमी आहे. त्यामुळे
तिळाचे उत्पादन वाढवणे ही देशाची गरज आहे. त्यासाठी योग्य जातींची निवड करणे, वेळेवर पीक

संरक्षण, पाणी व्यवस्थापन, तिळाची काढ्णी योग्य अवस्थेत करणे यासारख्या तंत्राचा वापर करून
तिळाची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात होत असलेल्या तेलाची आयात करणे थांबेल व
सर्वसामान्यांच्या आहारातील तेलाचे प्रमाणही वाढेल.

डॉ.सुशिल सातपुते,
सहायक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग
एमजीएम, नानासाहेब कदम कृषि महाविद्यालय ,गांधेली, औरंगाबाद

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close