Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

भोकरदन शहरातील मिनी बायपास रस्त्यावरील पुलाजवळ खड्डे व खांब जैसे थेच!

MH20LIVE NEWTORK सुरेश गिराम
भोकरदन:शहरातील महात्मा फुले चौक ते सा बा विश्रामगृह पर्यंत मिनी बायपास रस्ता काढण्यात आला असून या रस्त्याच्या कामासाठी नगर परिषद ने लाखों रुपये खर्च ही केले परंतु पुखराज नगर शेजारील पुलाजवळील काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत परिणामी वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे तसेच ऐन रस्त्यावर असलेला वीज वितरण चा खांब ही हटविण्यात आला नाही त्यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील तीन ते चार वर्षांपूर्वी सदरील रस्त्याचे काम करण्यात आले. सदरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले .परंतु काही कारणास्तव पुलाचे काम ही गुत्तेदाराने टप्प्या टप्प्याने का होईना केले खरे पण पुला जवळील डांबरीकरण न करता ते काम अर्धवट सोडून पोबारा केला. त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास वाहनधारकांना भोगावा लागत आहे.
शहरातील वाहतुकीची कोंडी हाऊ नये म्हणून मिनी बायपास रस्ता करण्यात आला परंतु अर्धवट कामामुळे वाहनधारकांना शहरातूनच जावे लागत आहे.

नगर परिषद प्रशासन मिनी बायपास कडे कधी लक्ष देणार
दरम्यान, मिनीबायपास रस्त्यावरील काम अर्धवट सोडून गुत्तेदार पसार झाला असला तरी नगर परिषद प्रशासन व पदाधिकारी या कडे का लक्ष देत नसतील असा प्रश्न वाहनधारकांना तसेच सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
सदरील काम जुन्या रेट प्रमाणे करण्यात आले आहे. परंतु आजरोजी हे काम जुन्या रेट ने परवडत नाही आता नवीन रेट प्रमाणे नगर परिषद ने बील अदा केल्यास काम करू असे गुत्तेदाराने सांगितले असल्याची चर्चा आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close