भोकरदन -ट्रक दुचाकी अपघातात पिशोरच्या पतिपत्नीचे हात पाय चिरडून तुकडे

MH20LIVE NETWORK
भोकरदन/सुरेश गिराम
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील माजी आमदार कार्यालय समोर पिशोरच्या एका पतिपत्नी चे ट्रका खाली येऊन हातपाय चिरडल्या ची घटना घडली आहेया बाबत मिळालेल्या माहितीनुसार की पिशोर ता.कन्नड जि. औरंगाबाद येथील गोरख आनंदा सपकाळ वय 41 सोबत पत्नी कांताबाई गोरख सपकाळ वय 38 हे भोकरदन तालुक्यातील पारध येथे वयक्तिक कामानिमित्त आपल्या क्र.एम एच 20 इ ए 4214 युनिकॉर्न दुचाकीवर आले होते तेथून परतत असतांना भोकरदन सिल्लोड रोडवरील माजी आमदार कार्यालय समोर एका छोट्या चारचाकी क्र. एम एच 20 इ वाय 7119 मधील चालकाने अचानक थांबून गाडीचे दरवाजा उघडला असता माघून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धक्का बसला आणि हे दोघे पतिपत्नी दुचाकी जवळून जाणाऱ्या ट्रक क्र एम एच 18 ए ए 9370 च्या घाली पडले त्यात कांताबाई सपकाळ यांच्या एका पायाचा चिरडून तुकडा पडला तर पती गोरख सपकाळ यांच्या हाताचे मनगट चिरडून गंबीर जखमी झाले होते तात्काळ घटनास्थळी नागरिकांनी दोघे पतिपत्नी ला उपचारासाठी भोकरदन मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते तर पुढील उपचारासाठी या दोघांनाही औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे तर तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी येऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली तर त्या छोट्या चारचाकी वाहन चालकाला ताब्यात घेतले व सोबत ट्रक चालक सहचालक ट्रक सोडून पसार झाले असता त्यांनी ट्रक ला ताब्यात घेतले होते व जखमींची पडलेली तुकडे रुग्णालयात नेले होते.