Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पाचवी ते बारावीच्या कोचिंग क्लासला मनपा आयुक्तांची अटी व शर्तींसह परवानगी

         औरंगाबाद : शहरातील खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी केलेल्या मागणी वरून इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वीचे प्रत्यक्ष खासगी कोचिंग क्लासेस मधील वर्ग सुरू करण्यासाठी अटी व शर्तींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे, असे महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आदेशात नमूद केले आहे.

          आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ति, संस्था, समिती यांचे विरूद्ध भारतीय दंड संहिताचे कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवाय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 याची कलम 51 ते 60 च्या तरतूदीनुसार देखील अशा व्यक्ति, संस्था, समिती यांचे विरूद्ध कार्यवाही करण्यास पात्र असतील.

    आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 73 अन्वये कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते कृत्य व सद्हेतूने केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांचे विरूद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

*****

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close