Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक

माधव पाटणकर यांनी अल्पशा आजाराने वयाच्या 78 व्या वर्षी निधन

मुंबई : ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचे काल (14 जून) रात्री निधन झाले. अल्पशा आजाराने अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माधव पाटणकर हे उद्योजक होते. रश्मी ठाकरे यांचं माहेर डोंबिवली येथील आहे.
‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचे काल (14 जून) रात्री निधन झाले. अल्पशा आजाराने अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान रश्मी ठाकरे यांनी पितृशोक झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माधव पाटणकरण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करून म्हटले आहे की, सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक सौ.रश्मीताई ठाकरे यांचे वडील,उद्योजक श्री.माधवराव पाटणकर यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ सौ.रश्‍मीताईंना मिळो, ही प्रार्थना! मी, पवार कुटुंबीय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close