Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

पाकिस्तानात कराची विमानतळाजवळ प्रवासी विमान कोसळून अपघात!

नवी दिल्ली : कराची विमानतळाजवळ उतरण्यापूर्वी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान कोसळून मोठा अपघात झाला.  हे विमान दुपारी अडीचच्या सुमारास लाहोरहून कराचीला निघाले होते. हे विमान जीना गार्डनजवळ कोसळले. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. कराची विमानतळाजवळील निवासी भागात ते क्रॅश झाले. पीआयएचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी विमान कोसळल्याच्या बातमीला दुजोरा दिला.
हे विमान दुपारी अडीचच्या सुमारास लाहोरहून कराचीला निघाले होते. कराची विमानतळाजवळील निवासी भागात हे विमान जीना गार्डनजवळ कोसळले. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. या ए-320 विमानात एकूण 107 लोक होते. पैकी 99 प्रवासी आणि क्रूचे आठ सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 ते 20 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. हे विमान सुमारे दहा वर्षे जुने आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विमान अपघाताच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की पीआयएच्या दुर्घटनेची घटना धक्कादायक आणि खेदजनक आहे. मी पीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरशद मलिक यांच्या संपर्कात आहे. अर्शद मलिक कराचीला रवाना झाले आहेत.  अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचा लोट दिसत आहे. बचाव अधिकारी जखमींना जवळच्याच रुग्णालयात भरती केले आहे. विमान अपघातामुळे कराचीतील सर्व मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. पाकिस्तान लष्कराच्या मीडिया विंग इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनने (आयएसपीआर) ट्विट केले की, पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर मदतीसाठी पोहचले आहेत. सैन्यदलाची क्विक अॅक्शन टीम आणि पाकिस्तानी सैनिक नागरिकांच्या मदत व बचावासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close