Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जूलै


ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद mh20live Network : औरंगाबाद जिल्ह्यासाठी सन 2020-21 खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली असून विमा उतरविण्याची अंतिम तारीख 31 जूलै 2020 असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. टी.एस. मोटे यांनी कळविले आहे.
या योजनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगामातील 9 पिकांना (ख.ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापुस, ख.कांदा, मका) विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना या वर्षापासून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून गावपातळीवर अधिकची सुरक्षा म्हणून आपले सरकार सेवा केंद्राव्दारे महा-ई-सेवा केंद्रावर सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. किंवा पिक विमा www.pmfby.gov.in या पोर्टलवर थेट अर्ज करु शकता.
सदरील योजना ऐच्छिक असल्याने कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाच्या रक्कमेतून विमा हप्ता वजा होऊ द्यावयाचा नसेल तर 23 जूलै पूर्वी आपल्या कर्जाऊ बँकेस तशा स्वरुपाचे लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. अधिक माहिती महाराष्ट्र शासनाची www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. योजनेकरीता पुढील तीन वर्षासाठी (2020-21 ते 2022-23) खरीप व रब्बी हंगामासाठी एच.डी.एफ.सी एर्गो ही विमा कंपनी अधिसुचित क्षेत्रात
अधिसुचित पिकांसाठी काम करणार आहे. पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुकची पहिल्या पानाची स्पष्ट झेरॉक्स प्रत, पेरणी प्रमाणपत्र, जर कुळासाठी लाभ घ्यावयाचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतकऱ्याचा करारनामा, जमिनीच्या गटक्रमांक व खाते क्रमांक निश्चित माहिती होण्यासाठी 7/12 उतारा इ.कागदपत्रे आवश्यक आहे. तरी योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
उपविभागीय कृषी अधिकारी, नजिकचे आपले खाते असलेली बँक व सेतू सुविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. असे,आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. टी.एस. मोटे यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close