Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द-कार्यकर्त्यांना भावूक साद

बीड :mh20live Network

 भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा तीन जून रोजी स्मृतीदिन आहे. दरवर्षी या दिवशी गोपीनाथ गडावरती स्मृतिदिनाचे कार्यक्रम होत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट आणि संचारबंदी यामुळे गडावर होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यासुद्धा या दिवशी परळीला पोहोचू शकणार नाहीत अगदी मनावर दगड ठेवून साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही असे पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे जाहीर केले आहे.

गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून साजरा केली जाते. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. पण सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक तसंच राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. यामुळे गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच समर्थकांना दर्शन घेण्यासाठी गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे.

काल बीड जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले. गेले दोन-तीन दिवस कोरोना आणि ३ जूनच्या कार्यक्रमा संदर्भात त्यांच्याशी…

Pankaja Gopinath Munde यांनी वर पोस्ट केले रविवार, ३१ मे, २०२०
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close