Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

पंकजा मुंडे,तावडे,आशिष शेलार भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ?


ताज्या बातम्या साठी subscribers-करा,MH20LiVE बघत राहा www.mh20live.com
नवी दिल्ली –भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत तळ ठोकून असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या गोटातील हालचालीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच माजी मंत्री हंसराज अहिर यांनाही राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भाजपच्या संसदीय कार्य समितीत नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
     दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपच्या राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी म्हटले होते.मात्र पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर नेमकी कोणती जबाबदारी देण्यात येणार? हे अजून गुलदस्त्यात आहे. विनोद तावडे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली नव्हती. तसेच राज्याच्या कार्यकारिणीतही त्यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात येणार असल्याचे कळते. फडणवीसांच्या खास मर्जीतले असणारे आशिष शेलार यांना  राष्ट्रीय कार्यकारिणीत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळणार नाही.खडसे यांनी आधीच राष्ट्रीय राजकारणात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर कोणतीही जबाबदारी दिली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close