Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

श्रीदत्त मंदिर, महानुभाव आश्रम वरझडी येथे पंचावतार उपहार महोत्सव संपन्न

वरझडी: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वरझडी येथील श्रीदत्त मंदिर, महानुभाव आश्रम येथे पंचावतार उपहार महोत्सव करण्यात आला. मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या चरित्र, आख्यान, कथा, कीर्तन, प्रवचन, पोथी, पारायण, अर्चन आदि विधी संपूर्णभारतभर करण्यात येतात. मार्गशीर्ष महिन्यात वरझडी गावात सर्व ग्रामस्थ महिला, प्रातःकाळी 4 वाजता श्रीदत्त मंदिरात एकत्र जमून दही दुधाने मंगलाभिषेक करतात, श्रीदत्तात्रेयकवच पारायण करतात आणि श्रीदत्त नामाचे अखंड स्मरण करतात. या वर्षी कोरोना काळ असल्याने हे सर्व धार्मिक विधी कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले. तपस्विनी ताईबाई कोठी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तपस्विनी चंचलाताई कोठी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी धर्मसभा संपन्न झाली महंत फलटणकर बाबा यांनी ध्वजारोहण केले व आपले आयुष्य आनंदी कसे होईल? अध्यात्माचं काय महत्त्व आहे? आदी विषयावर भाष्य केले. महंत आवेराज बाबा कोठी यांनी सभेचे दीपप्रज्वलन केले व महानुभाव साहित्य, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांच्याविषयी मार्गदर्शन केले. सदभक्त ईश्वर पाटील पठाडे यांनी महिला भजनी मंडळास हार्मोनियम दान देण्याचा संकल्प केला. मोहन बाभूळगावकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सूत्रसंचालनात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या जीवनविषयक विचारांचा वेळोवेळी संदर्भ दिला. सौ. सिंधुबाई कोठी यांनी तपस्विनी ताईबाई कोठी, तपस्विनी चंचलाताई कोठी व तपस्विनी शारदाताई बाळापूरकर यांचे पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून स्त्रीकर्तृत्वाचा सन्मान केला. धर्मकुमार कृष्णा कोठी याने सर्वांचे आभार मानले. यावेळी तपस्विनी मथुराबाई फलटणकर यादेखील उपस्थित होत्या.तद्नंतर पंचावतार उपहार, पंचकृष्णांची महाआरती संपन्न झाली. उपस्थित सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close