Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेशराजकीय

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात; भाजप नेते रावसाहेब दानवेंचा अजब दावा

जालनाः केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशाची राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.राजधानी दिल्लीत गेल्या १३ दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचेच नेते या आंदोलनावर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.जालन्यातील एका कार्यक्रमादरम्यान दानवे बोलत होते. यावेळे ते म्हणाले की, हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे आहे. केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे. सध्या दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे, त्यात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवले होते. आता भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करायला हवा, असे आवाहनदेखील दानवे यांनी यावेळी केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close