Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सात वर्षापासून फरार आरोपीस पकडण्यात पैठण पोलिसांना यश


पैठण : गेल्या सात वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यातील फरार आरोपी ला पैठण पोलिसांनी केले जेरबंद. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार वाटमारी आणि दरोडा अश्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी विजय दिनकर कापसे रा.इंदिरानगर पैठण याला पैठण पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी अटक केली. सन २०१३ आणि २०१४ मध्ये भा.द.वि.३९२, ३९४, अश्या चोरी व दरोडा गुन्ह्यातील आरोपी विजय कापसे याच्या अटकेसाठी पैठण पोलिसांनी कार्यवाही करत सोमवारी दुपारी गोपनीय माहितीच्या आधारावर सपोनि गजानन जाधव यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पळून जण्याचा प्रयत्न परंतु सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला पकडले व जेलचा रस्ता दाखवला. वरील कार्यवाही जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि गजानन जाधव उपपोनी रामकृष्ण सागडे, छोटुसिंग गिरासे, पोना गोपाल पाटील, गणेश कुलट, योगेश केदारे यांनी केली. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close