Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

‘पडळकरांच्या तोंडाला काळे फासणार’, राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.शरद पवारांवर टीका करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. तसेच ही भाजपची संस्कृती आहे का? देवेंद्र फडणवीसांनी याचे उत्तर द्यावे, असेही आव्हाड म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांनी पडळकर यांच्यावर या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे. नेम आणि फेम मिळवण्यासाठी शरद पवारांवर टीका केली जाते. बिरोबा यांना सुबुद्धी देवो, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. ‘पडळकर यांनी पातळी सोडून शरद पवारांवर टीका केली, याबद्दल त्यांनी माफी मागावी. त्यासाठी राष्ट्रवादी पुण्यात उद्या मंडईतील टिळक पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितले. ‘विधानसभेवेळी पडळकरांसारखा व्हायरस बाजूला ठेवला, याबाबत बारामतीकरांचे आभार. तुमचे जेवढे वय नाही तेवढा काळ शरद पवार राजकारणात आहेत. त्यांनी भाजपची असभ्य संस्कृती खूप लवकर आत्मसात केली, ‘ अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली. गोपीचंद पडळकर यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, त्यांना मानसोपचाराची आवश्यकता आहे, त्याचा खर्चही राष्ट्रवादी युवक काँग्रेस उचलायला तयार आहे. पुढच्या वेळी बोलताना कोणाबद्दल बोलत आहोत हे लक्षात ठेवा, नाहीतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस धडा शिकवल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस गोपीचंद पडळकर यांचे तोंड काळे करून त्यांना चोप देणार,’ असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close