Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे रुग्णालय मंजुरी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यास यश

उस्मानाबाद,दि.14: मुंबई येथे काल झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आज आभार मानले आहेत.

 उस्मानाबादकरांच्या या जुन्या मागणीबाबत पालकमंत्री  श्री. गडाख यांनीही सातत्याने संबधित विभाग आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत आणि वेळोवेळी पत्र देऊन पाठपुरावा केला होता. त्याचेच यश म्हणजे काल राज्यमंत्री मंडळाने येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि  430  खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मिळालेली मंजुरी आहे.

            पालकमंत्री श्री.गडाख यांनी 21 जानेवारी 2020 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून  या पत्रात त्यानी यापूर्वी उस्मानाबाद येथे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याविषयी घोषणा करण्यात आली होती. यांची आठवण देऊन त्याअनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांनी प्राथमिक अहवाल आपल्या विभागाकडे सादर केला आहे. उस्मानाबाद येथील या नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी 26.50 एकर जमीन उपलब्ध आहे.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुसज्ज इमारत उपलब्ध आहे.असे या पत्रात नमूद करून पालकमंत्री गडाख यांनी या पत्रात उस्मानाबाद येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागास दयावेत, अशीही विनंती  मुख्यमंत्री  श्री. ठाकरे यांनी केली होती.

            उस्मानाबाद येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी 674 कोटी  14 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास  आणि पदे भरण्यासही कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.उस्मानाबाद हा जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे.येथील रुग्णांना लातूर आणि सोलापूरच्या रुग्णालयावर अवलंबून रहावे लागत होते. हे अवलंबित्व आता संपणार आहे.तसेच या जिल्हयास ऐतिहासिक आणि  धार्मिक पर्यटनाचीही पार्श्वभूमी आहे.त्यामुळे या जिल्हयाच्या विकासात हे महाविद्यालय मैलाचा दगड ठरणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close