Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

जालना जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश



जालना: जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदासाठी दि.10 ते 12 फेब्रुवारी 2021 या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना दिले आहेत. जालना जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुद्दत जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत संपली आहे.अशा 474 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक मागील जानेवारी महिन्यात पार पडली असून नवनिर्वाचित सदस्यांची यादी जिल्हा प्रशासनाने 21 जानेवारी रोजी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आज शुक्रवारी जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होते याकडे ग्रामीण भागातील जनतेत गेल्या काही दिवसांपासून मोठी उत्सुकता लागून होती.आज शुक्रवारी आरक्षण सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी निवडणूक पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी दि.10 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना दिले आहेत. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ही निवड पार पाडावी व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात यावा असेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी आपल्या या आदेशात स्पष्ट केले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close