Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

राज्यशासनाचे अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश


राज्यशासनाचे अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश

कन्नड / कल्याण पाटील mh20live Network

   कन्नड  तालुक्यात  जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सविस्तर प्रस्ताव विविध प्रपत्रात पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे . या जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते मात्र सप्टेंबर महिन्यात ही मोठ्या पावसाने थैमान घातले व बऱ्याच ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्याअनुषंगाने सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी प्रकरणी बाधित शेतकऱ्यांना दि १३ मे २०१५ च्या शासन निर्णया विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा सविस्तर एकत्रित प्रस्ताव कृषी आयुक्त यांच्या मार्फत शासनास पाठवण्यात यावे असे पत्र महसूल विभागाला उदय गवस कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांना दिले आहे . तोंडा हाताशी आलेले शेतातील पिके अतिवृष्टीमुळे गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता आता राज्यशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यांने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक धिर मिळण्याची शक्यता मोकळी झाली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close