Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादक्रीडा व मनोरंजन

शाहीर विश्वास साळुंके, घनघाव यांना ऑनलाइन श्रद्धांजली !

औऱंगाबादmh20live Network

     प्रसिद्ध लोककलावंत विश्वास साळुंके यांच्या कार्याला आणि अभिनयाला उजाळा देत शहरात मान्यवर लोककलावंतांनी श्रद्धांजली वाहिली. दरवर्षीप्रमाणे लोककला सादरीकरण आणि श्रद्धांजली वाहण्याचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला नाही. ऑनलाइन उपक्रमातून साळुंके यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. दिवंगत लोककलावंत विश्वास साळुंके आणि विनोदमूर्ती पंढरीनाथ घनघाव यांना २१ व्या स्मृतिदिनी मंगळवारी (२ जून) ऑनलाइन उपक्रमाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2071180316357255&id=100003959213592

शहरातील विविध कलाकारांनी साळुंके यांच्या कार्याला उजाळा देत भावना व्यक्त केल्या. मागील २१ वर्षांपासून विश्वास साळुंके स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने गरवारे कम्युनिटी सेंटर येथे आठ दिवसांचे लोककला प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असते. यावर्षी करोना संसर्गामुळे शिबिर घेण्यात आले नाही. युवा शाहीर अजिंक्य लिंगायत यांच्या पुढाकाराने ऑनलाइन उपक्रमातून साळुंके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. “शिक्षक असलेले विश्वासराव हाडाचे लोककलावंत होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम केले. लोककलेचा छंद जोपासला. राज्य पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. लोककलेचा वारसा टिकवण्यासाठी प्रतिष्ठान लोककला शिबिर भरवते. गण, गवळण, भारूड, पोवाडा, लावणी, भजन, जागरण गोंधळ, केशभूषा, वेशभूषा, वाद्यांची ओळख, नाट्यछटा, अभिनय या विषयांवर ६ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या शिबिरातून उत्तम कलाकार घडले”, असे प्रतिपादन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष कमल साळुंके यांनी केले. “पैशाला अनेक वाटा”, “हपापाचा माल गपापा” अशी लोकप्रिय नाटकं साळुंके यांनी लिहिली. आकाशवाणीसाठी लहान-मोठे कार्यक्रम केले. त्यांच्या नाटकांना राज्य स्पर्धेत पुरस्कारही मिळाले. पण, हे साहित्य प्रकाशित झाले नव्हते. प्रतिष्ठानच्या परिश्रमातून १० ते १२ नाटकांचे प्रकाशन झाले”,  असे प्रसिद्ध लोककलावंत दिलीप खंडेराय यांनी सांगितले. हरी कोकरे, शाहीर रामदास धुमाळ, ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, शाहीर डाँ. शेषराव पठाडे, अभिनेत्री शोभा दांडगे, माधुरी साळुंके- शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. आतापर्यंत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची चित्रफित दाखवण्यात आली.               0 स्मृती कायम जपणार !विश्वास साळुंके या हरहुन्नरी कलाकाराचे अपघाती निधन झाले. त्यांच्या अप्रतिम कलेने ते राज्यभर परिचित होते. सिडको परिसरातील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या एका शाळेला नाव देण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे कलाकारांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close