Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

ऑन लाइन शिक्षण ही काळाची गरज आहे

ऑन लाइन शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षणामुळे मानवाने  खुप मोठया प्रमाणावर उत्क्रांती साध्य केली  आहे. शिक्षण घेतल्यामुळे मानवाला आपल्या मूलभूत हक्काचे महत्त्व व  सामाजिक कर्तव्य यांची जाणीव होते .  परंतु देशावर ओढावलेल्या या कोरोना रुपी संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने लॉक डाऊन सुरू केला परिणामी शाळा बंद राहू लागल्या .विद्यार्थ्यांच्या परीखा ही  रद्द झाल्या .विद्यार्थी घरातच बसून राहू लागले .पुढच्या वर्गाचा अभ्यास कसा करावा ? काय करावा ? तो अभ्यास शिक्षकांकडून कसा  तपासावा असे अनेक प्रश्न निर्माण झाले .आणि मग त्यावर ऑन लाइन शिक्षण ही संकल्पना पुढे आली व विद्यार्थ्यांना या ऑन लाइन शिक्षणाचा आनंद वाटू लागला .चला जाणून  घेऊ या या ऑन लाइन प्रणाली बाबत …या शिक्षणामुळे नवनवीन पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करू लागले .  त्यामुळे त्यांच्यातील  अज्ञान कमी होत गेले  ज्याने ऑन लाइन  शिक्षण घेतले ते आपल्या मित्रांना ही हे शिक्षण देऊ लागले . त्यामुळे त्यांच्यातील संवाद वाढला .जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही असे विद्यार्थी देखील या प्रणाली द्वारे शिक्षण घेऊ शकतात या प्रणालीचा वापरा साठी आपल्या घरात सहजच उपलब्धअसलेल्या मोबाईल ची आवश्यकता आहे .अर्थात कमीत कमी खर्चात आपण  गुणवत्तापूर्ण शिक्षण घेउ शकतो .काही विद्यार्थी  पुस्तकाचे स्वयं अध्ययन करून स्वतःच शिकणे पसंत करतात.काही विद्यार्थ्यांना  अध्ययन करतांना शिक्षकाची खूप जास्त मदत अपेक्षित असते.तर काही विद्यार्थ्यांना त्यांना गरज वाटेल तिथेच आणि हवी असेल तेंव्हाच  शिक्षकाची मदत अपेक्षित असते.त्यावेळेस या प्रणाली द्वारे विद्यार्थ्यांना लगेचच आपल्या शिक्षकांना फोन द्वारे संपर्क करू शकता . आनंददायी सहज शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढते.                                         पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत प्रत्येक तासिके चे महत्व व अस्तित्व  फक्त त्याच वेळी आणि त्याच वर्गात असते. तासिके च्या वेळे अगोदर किंवा नंतर, अथवा इतर वर्गात किंवा घरी  विद्यार्थी त्या तासिके चा अनुभव परत घेऊ शकत नाही. प्रत्येक तासिका ही स्वतंत्र आणि नवीन शैक्षणिक कृती असते. तसेच यात शिक्षकाची आवश्यकता असते .परंतु या प्रणालीत योग्य नियोजन केले तर आपल्या वेळेची बचत व शिक्षकाच्या कामाचा ताण कमी होऊ शकते . त्यांना प्रत्येक  वर्गात, नवीन तासिका घेण्याचा शिक्षकावरील कार्यभार कमी होत जातो. शाळेत  शिक्षक शिक्षक ज्या पद्धती ने शिकवतात त्याच पद्धती ने शिक्षण घ्यावें लागते . परंतु या पद्धती त मात्र विद्यार्थी आवडेल ती पद्धतीने शिक्षण घेऊ  वापरू शकतो.  शिक्षणव्यवस्थेत नियोजित वेळेत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करणे ही शिक्षकाची जबाबदारी असल्यामुळे, Interaction, Evaluation and Feedback ह्या सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक कृतींवर शिक्षक सहसा फक्त ५ ते १० टक्के वेळ देतात. ह्याचमुळे “प्रयत्नपूर्वक व शोधक वर्तनामुळे शिकणे” (Exploratory Learning) ही पद्धत देखील वेळेच्या अभावामुळे पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत फारच कमी वापरता येते. ह्या कारणाने साहजिकच पारंपारिक शिक्षणव्यवस्थेतील शिक्षण प्रक्रिया विद्यार्थ्यासाठी कंटाळवाणी होते.पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत शिक्षक-केंद्री पद्धती मुळे सहसा प्रत्येक विद्यार्थ्यास शिकण्याकरीता वेगवेगळ्या पद्धती वापरण्याची मुभा नसते. “ई लर्निंग” पद्धती मात्र निसर्गत: विद्यार्थी-केंद्री असल्यामुळे, विद्यार्थी त्याला आवडेल ती पद्धत निवडून वापरू शकतो या  पद्धतीत एकाच वेळी अनेक विद्यार्थी फायदा घेऊ शकतात . अभ्यासातील घटक शिकविल्या नंतर लगेचच सर्वच विद्यार्थ्याना तो घटक प्राप्त होतो .विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमते मध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ होते .वरील सर्व फायद्यामुळे मला वाटते की ऑन लाइन शिक्षण ही सध्याच्या काळात आवश्यक वाटते .
(टिप..-सबधीत लेखाशी ,एम एच20लाईव्ह नेटवर्क, एम.एच20लाईव्ह , जबाबदार नाही, लेखकच जबदार आसेल. )

लेख लेखक –-प्रदीप पंढरीनाथ माळी ( तज्ञ मार्गदर्शक , सहायक शिक्षक )स्व.भैरोमल तनवानी विद्यालय , बजाजनगर , औरंगाबाद .


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close