One Man Army वन मॅन आर्मी’ पाहण्यास सिध्द व्हा! पाहा विद्युतचा नॉक–आऊट पंच फक्त ‘अॅण्ड पिक्चर्स’वर!
4 जून रोजी रात्री 8 वाजता अॅक्शन हिरो विद्युत जमवालच्या ‘सनक’चा शनिवार प्रीमिअर पाहा फक्त ‘अॅण्ड पिक्चर्स’वर!
अॅक्शन, अॅड्रेनलाइन आणि विद्युत जमवाल ही सर्व समानार्थीच नावे आहेत, असे दिसते. आपल्या अचाट शक्तिशाली कामगिरीद्वारे विद्युत जमवालने हिंदी चित्रपटांतील अॅक्शन थरारपटांचा स्तर नेहमीच उंचावताना वेळोवेळी पाहिले आहे. आता त्याचा प्रदर्शित झालेल्या सनक चित्रपटातही विद्युतचे अॅक्शनप्रसंग हे एखाद्या व्हिडिओ गेमसारखे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. ‘सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या सहकार्याने ‘झी स्टुडिओज’ने ‘सनक’ सादर केला असून त्यात एका दहशतवाद्याच्या तावडीतून आपल्या प्रेयसीला वाचविणार््या वन मॅन आर्मीची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळेल. दर शनिवारी रात्री नव्या चित्रपटांचे टीव्ही प्रीमिअर प्रसारित करणार््या ‘अॅण्ड पिक्चर्स’ वाहिनीवरील ‘सॅटर्डे प्रीमिअर पार्टी’ मालिकेत 4 जून रोजी रात्री 8.00 वाजता विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘सनक’ चित्रपटाचा प्रीमिअर सादर होणार आहे.
‘व्हेन ही इज मॅड, ही इज बॅड’ असे त्याच्याबाबत म्हटले जाते ते खरेच आहे. कारण एरवी कोणत्याही हिंसाचारापासून दूर राहून एक कुटुंबवत्सल, सामान्य जीवन जगणारा तो आपल्या बॅकफ्लिप्स आणि ताकदवान ठोशांनी शत्रूला चितपट करतो. शक्ती आणि जोश यांचे अचूक मिश्रण असलेला विद्युत जमवाल एका रुग्णालयाला दहशतवाद्याच्या तावडीतून वाचवितो. या दहशतवाद्याची भूमिका चंदन रॉय सन्यालने साकारली असून त्याला भक्कम पाठिंबा देणार््या पोलिस अधिकार््याच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा धुपिया आहे. रुख्मिणी मैत्रा ही त्याला भक्कम आदार देणारी त्याची मैत्रीण आहे. इतके सर्व ताकदीचे कलाकार या चित्रपटात एकत्र आल्यानंतर त्यातील एक क्षणही प्रेक्षकांना कंटाळवाणा होणार नाही.
आपल्या भूमिकेवर नेहा धुपिया म्हणाली, “सनक हा एकमेवाद्वितीय अनुभव होता, असंच मी म्हणेन. चित्रपट उद्योग आणि बाहेरच्या जगात चित्रपटांची आवड किती बदलली आहे, याची मला तेव्हा जाणीव झाली. मी तेव्हा गर्भवती असले, तरी मी या चित्रपटात आरामात भूमिका साकारली. दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या रुग्णालयातील निरपराध लोकांना वाचविण्यासाठी त्यांच्यातीलच एक सामान्य माणूस पुढे येतो. चित्रपटात केवळ त्याच्यावरच भर दिला असला, तरी संघवृत्तीने आणि निश्चयाने काम केल्यास तुमची शक्ती कशी वाढते, त्यावरही या चित्रपटात भर दिला आहे. चित्रपटाच्या या संदेशाने मला मोहित केलं आणि मी ही भूमिका स्वीकारली. ज्यांना अॅक्शनपट पाहायला आवडतात, त्यांनी सनक बघायलाच हवा.”
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल चंदन रॉय सन्याल म्हणाला, “मला खलनायकी भूमिकांचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. एखादी व्यक्तिरेखा तशी का आहे, यामागे खास कारण असतं आणि मला त्याबद्दल नेहमीच कुतुहल वाटत आलं आहे. जोकरशिवाय डार्क नाइट कधीच यशस्वी होत नाही आणि सनकमध्ये मला नायकाविरोधात ही नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ही व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी त्यासाठी भरपूर पूर्वतयारी करावी लागली. अॅक्शन प्रसंगांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही खास अमेरिकेवरून अॅक्शन स्पेशालिस्ट आणले होते. त्यातील प्रत्येक क्षणाचं काटेकोर वेळापत्रक आखण्यात आलं होतं. सनकचं चित्रीकरण हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात उत्साहजनक काळापैकी एक आहे आणि प्रेक्षकांनाही टीव्हीवर हे प्रसंग पाहताना खूप मजा येईल, याची मला खात्री आहे.”
या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री रुख्मिणी मैत्रा म्हणाली, “माझ्या दृष्टीने सनक ही माझी आवड आहे. जीवनात जर मी एखादी गोष्ट करण्याचं ठरवलं, तर मला त्यासाठी 200 टक्के काम देण्याची इच्छा असते. मला पूर्वीपासूनच बॉलीवूडचे चित्रपट पाहायला आवडायचे. त्यामुळे बॉलीवूडमधील एका चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळणं आणि तीसुध्दा अॅक्शनपटांचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या विद्युतबरोबर, ही गोष्ट माझ्यासाठी फारच मोठी होती. तो एक फार उत्तम माणूस आहे. या चित्रपटाचं प्रारंभीचं दृष्य पाहून माझ्या मनात खूपच उत्कंठा निर्माण झाली होती. एरवी विद्युत हाच लोकांना जमिनीवर लोळवीत असतो. पण यात एक महिला त्याला खाली धरून ठेवते. त्याने या प्रसंगासाठी मला विशेष प्रशिक्षण दिलं. मला ते शिकताना फार भीती वाटत होती, पण हाी प्रसंग उत्कृष्टपणे साकारण्यासाठी ते गरजेचं होतं.”
सनकमध्ये प्रेक्षक थरार, गूढता आणि भावभावनांच्या हिंदोळ्यावर सतत झुलत राहतील. एका दहशतवाद्याने एका रुग्णालयाचा ताबा घेतलेला असतो आणि त्यात नेमकी आपला नायक विवानची (विद्युत जमवाल) प्रेयसी आशिका (रुख्मिणी मैत्रा) अडकलेली असते. शिवाय त्यात अनेक असहाय्य रुग्णही असतात. तणावपूर्ण वातावरणात या रुग्णालयात अखेरीस चांगल्या ताकदींना दुष्ट शक्तींवर विजय कसा मिळतो, ते पाहायला मिळेल.
4 जून रोजी रात्री 8.00 वाजता पाहा जबरदस्त अॅक्शन प्रसंगांनी भरलेला ‘सनक’चा प्रीमिअर फक्त ‘अॅण्ड पिक्चर्स’वर!