Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

एक लाख ३४ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ६४ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती


मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ६४ लाख १९ हजार ८७८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख २८ हजार व्यक्ती क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ०४ हजार ३१पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९ जून या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २७९ (८५८ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ३५१

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख २८ हजार ९२.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८४ हजार १६१

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४८

(मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना १)

कोरोना बाधित पोलीस – ११८ पोलीस अधिकारी व ९८२ पोलीस कर्मचारी

राज्यातील एकूण रिलिफ कँप – ९८ (सुमारे ३ हजार २३५ लोकांची व्यवस्था)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close