Subscribe to our Newsletter
क्राईम

पिक अप दुचाकीच्या धडकेत एक ठार दोन जखमी; पोखरी जवळ घडली घटना

आष्टी:पिक अप दुचाकीच्या धडकेत एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना जामखेड रस्त्यावर पोखरी जवळ घडली. हि घटना रात्री उशिरा घडली.
आष्टी तालुक्यातील पांढरी येथील कानिफ भिमराव वांढरे वय ३८ वर्षे हे आपल्या पांढरी गावाकडून घरी जात असताना पोखरी गावाजवळ पिक अप आणि त्यांच्या दुचाकीच्या धडकेत ते जागीच ठार झाले. त्यांची पत्नी व मुलगी या गंभीर जखमी झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील पांढरी येथील कानिफ वांढरे यांचा कुकुटपालन व्यवसाय आहे. ते आपल्या दुचाकी क्रं. MH 23 AP 5180 वरुन आपल्या गावाकडून पोखरी येथील त्यांच्या कुकुट पालन व्यवसायकडे जात होते.
पोखरी गावाजवळ जामखेड कडून नगर मार्गे जात असलेल्या पिक अप क्रं. (MH 14 V 9019 )यांची धडका होऊन कानिफ वांढरे हे ठार झाले. घटनास्थळी ग्रामस्थानी व नातेवाईकांनी धाव घेत पत्नी सोनाली वांढरे ( वय ३० ),मुलगी संस्कृती वांढरे वय ९ वर्षे यांना उपचारासाठी अहमदनगर येथील मॅक्स केअर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृत वांढरे यांच्यावर पांढरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आले.या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे,पो का संजय गुजर हे करीत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close