Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

नांदेड:कुंचेली फाट्या जवळ दोन वाहनाचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू


नायगाव ता /शेषेराव कंधारे
                    नांदेड -देगलूर राज्यमहामार्गावर कुंचेली पाटी जवळ ट्रक आणि एचअर टेंपोची समोरासमोर धडक होवुन   झालेल्या दोन वाहनाच्या अपघातात एकजण जागीच ठार झाल्याची घटना दि.१३ जूनच्या मध्यरात्री च्या दरम्यान घडली आहे .  
         सविस्तर माहिती असी की नांदेड- देगलूर या राज्य महामार्गावरील नायगाव  तालुक्यातील कुंचेली पाटी जवळ देगलुर  कडुन नायगाव  कडे  बिस्कीट भरून जाणारा ट्रक क्र.एम.एच.26 ए.डि.0402 आणि नांदेड कडून देगलुर कडे जाणा-या एचअर क्रमांक एम.पी.13 जि.ए.1968 या दोन वहाणाची समोरासमोर धडक होवुन एचअर मधील किनर केजपाल देवशाह गावसकर  यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर  जखमी झालेल्याची घटना दि.13 जूनच्या मध्यरात्री च्या दरम्यान घडली आहे.  
     दोन्ही वहाणे एकमेकांवर आदळुन झालेल्या या भिषण अपघातात एचअर टेंपोच्या काॅबीनचा चुराडा झाला तर ट्रकच्या तिन पलट्या होवुन मोठ्या खड्यात कोसळला आहे. 
          मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास रामतीर्थ पोलीस स्टेशनला फोन येताच सपोनि सोमनाथ शिंदे व पोलीस कर्मचारी राठोड, क्षीरसागर, मिरदुडे, ड्राव्हवर राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या घटनेतील आयशर टेम्पो मधील किनरला नायगाव  रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close