Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

कन्नड:शेतीच्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू तीन जण जखमी

 कन्नड / कल्याण पाटील

शेतीच्या वादातून झालेल्यामारहाणीत एका जणाचा खून झाला तर तीन जण जखमी झाले. ही घटना कन्नड तालुक्यातील गराडा येथे मंगळवारी सायंकाळी घडली. सुरेश छगन चव्हाण (५०) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादी मच्छिंद्र  चव्हाण यांच्या तक्रारीवरून कन्नडशहर पोलीस ठाण्यात चार जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी.सहा वाजेच्या दरम्यान फिर्यादीमच्छिद्र छगन चव्हाण हा भाऊ सुरेशचव्हाण व रितेशने कुन्हाडीने डोक्यात वार करूनकिसन चव्हाण  यास जखमी केले.यांच्यासोबत भांडण सोडविण्यास आलेल्या सुरेश चव्हाण व किसण चव्हाण यांच्या सोबत वेगवेगळ्या दुचाकी ने शेतात कुंटुंबाला आणण्यासाठी जात होते.त्यांच वेळी आरोपी राजू चव्हाण , रितेश चव्हाण ,ताईबाई ऊर्फ गिता व त्यांची मुलगी आरती हे शेतातून घरी येत होते . यादरम्यान फिर्यादीची पत्नी अनिता व भाउजाई शोभा याही घराकडे निघाल्या होत्या रस्ताच किसण चव्हाण व राजू चव्हाण यांच्यात वाद सुरू असताना रितेने डोळ्यात वार करून किसन चव्हाण यांस जखमी केले.तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सूरेश चव्हाण यांच्या डोक्यात राजू चव्हाण यांने कुराडीने वार केल्यांने ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. फिर्यादी तसेच शोभा सुरेश चव्हाण , किसन चव्हाण या मारहाणीत जखमी झाले. बैशुध्द अवस्थेत कन्नड ग्रामीण रुग्णालयात नेले असता. वैद्यकीय अधिकारी यांनी सुरेश यांस तपासणी करून मृत्यू घोषित केले . कन्नड शहर पोलिस ठाण्यात मछिद्र चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव शहर पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहयक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य , किरण गड्डे पुढील तपास करीत आहेतदरम्यान दिनांक २३ सप्टेंबर रोजी मयत सुरेश चव्हाण यांची उत्तरणीय तपासणी वैद्यकीय अधिकारी यांनी केली मात्र मृत्यू सुरेश चव्हाण यांच्या मुलांनी माझ्या वडीलांच्या खुनात आणखी लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी लावून धरली .शहर पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी व प्रतिष्ठित नागरीकांनी मयत सुरेश चव्हाण यांच्या नातेवाईकांना समजून सांगीतल्यांने दुपारी तीन वाजता प्रेत नातेवाईक यांनी ताब्यात घेतले. गराडा येथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close