Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

वडीगोद्री जवळ कारला पाठीमागून अज्ञात वाहनांने धडक दिल्याने कारमधील एक जण ठार, चार जखमी


धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना, अज्ञात वाहन झाले पसार


        पाचोड- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री जवळ होंडा सिटी या कारला पाठीमागून अज्ञात वाहनांने धडक दिल्याने कारमधील एक जण ठार झाले असून चारजण गंभीर जखमी झाले आहे.ही घटना शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे.            याविषयी माहिती अशी की,औरंगाबाद येथील काही तरुण आपल्या चार चाकी वाहने फिरण्यासाठी गेले असता शनिवार पहाटे औरंगाबादकडे येत असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या होंडा सिटी क्र.एम.एच.२० सीयू ९७८६ या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने यातील शिव पुरुषोत्तम अग्रवाल (वय १७ वर्षे ) रा.औरंगाबाद हा जागीच ठार आला असून कामील खान शब्बीर खान ( वय १६ वर्षे)रा.औरंगाबाद,सिडको,क्षितिज मनीष रनखांब (वय १६ वर्षे ) रा.औरंगाबाद,ओम अग्रवाल (वय १६ वर्षे) रा.औरंगाबाद,शेख मंजूर शेख बशीर (वय ५२ वर्षे),रा.औरंगाबाद हे चौघे गंभीर जखमी झाले.          हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी या पाचोड पासून जवळ असलेल्या भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकाला कळवल्या असता तात्काळ रुग्णवाहिका चालक आप्पासाहेब गाडेकर,महेश जाधव,विठ्ठल गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन यांना तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहेत.             यावेळी वैद्यकीय अधिकारी संदीपान काळे यांनी यातील शिव अग्रवाल याला मयत घोषित केले असून चार जणांवर प्राथमिक उपचार केले आहे.या घटनेची नोंद गोंदी पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.           हा अपघात इतका भीषण होता की अक्षरशःया होंडा सिटी कार चे पाठीमागील भाग हा संपूर्ण चुरा झाल्याचे दिसत आहे.तसेच हा अपघात होतात अज्ञात वाहन त्या ठिकाणावरून पसार झाले आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close