Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

कार ट्रॅक्टरचा अपघात एक जखमी पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील घटना


पाचोड /प्रतिनिधी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस स्टेशन हद्दीतील मुरमा शिवारात कार व ट्रॅक्टरचा जोरदार अपघात होऊन एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे             या घटनेविषयी अधिक माहिती अशी की धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वरून बीड कडून औरंगाबाद कडे भरधाव वेगात जात असलेली कार क्रमांक एम एच २० सी एच ४८२५ व पाचोड कापूस खरेदी केंद्राची महावीर जिनिंग मध्ये कापूस खाली करून रस्ता क्रॉस  करत असलेला ट्रॅक्टर या दोघांमध्ये जोराची धडक झाली या धडकी मध्ये डॉ मेहमूद मुलानी वय 37 रा औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच मुरमा येथील ग्रामस्थ उद्धव मगरे सोमनाथ गीतखाणे अमोल गितखने सह धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका येथील रुग्णवाहिका १०३३ कर्मचारी महेश जाधव, आप्पासाहेब गाडे व विजय धारकर  यांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचून जखमीला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविले असता डॉक्टरांनी तपासून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे या घटनेची नोंद पाचोड पोलिसात करण्यात आली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close