Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

जालन्यात गोवंश विक्री प्रकरणी एकास अटक. कदीम जालना पोलीस ठाण्याची कारवाई


जालना /mh20live Network
दि.14/06/2020 रोजी कदीम जालना पोलीसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, मिल्लतनगर चौक .जुना जालना येथे एक ईसम पत्राच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांचे मांस अवैधरित्या विक्री करीत आहे.त्यावरुन पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी वेळ 11.35 वा. छापा मारला असता त्याठिकाणी ईसम नामे अकबर गुलाम रसुल कुरेशी वय 30 वर्षे रा. दुःखीनगर जुना जालना हा मिळून आला. त्याच्या पत्राच्या शेडमध्ये पाहणी केली असता 22 किलो गोवंशीय जनावराचे मांस, लोखंडी स्टीलचा बैठा तराजू, वजनमापे,दोन धारदार सु-या, एक लोखंडी काणस व लोखंडी हुक असा एकूण रु.6350/- रुपयांचा मुद्येमाल मिळून आला आहे.महाराष्ट्र शासनानु गोवंशीय जनावरांचे मांस ताब्यात बाळगून विक्री करण्यावर बंदी घातलेली असतानाही ईसम नामे अकबर शुलाम रसुल कुरेशी हा गोवंशीय जनावरांचे मांस ताब्यात बाळगून विक्री करताना मिळून आल्याने त्याचेविरुध्द कलम 5(क).9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधि.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही एस.चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना, समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक, जालना, सुधीर खिरडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना, प्रशांत महाजन, निरीक्षक, पो.ठाणे कदीम जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी. ए.पोवार, पोना/हिवाळे, पोशि/कु-हाडे,
होमगार्ड/ पठाण, तुपे,राजपुरे यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close