Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंञी महाराष्ट्राशी राञी ७ वाजता बोलणार

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राञी 7 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंञी ठाकरे संध्याकाळी सात वाजता जनतेला संबोधित करणार असल्याने मुख्यमंञी नेमके काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्यात पुन्हा कोरोनाने थैमान घातले आहे. विदर्भात अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांच्या ठिकाणी तर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यापाठोपाठ पुण्यात देखील संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतही कोरोना वेगाने पसरतोय. या एकूण सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात मागिल10 ते 15 दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण अधिक संख्येने वाढू लागले आहे. राज्यातील मंत्र्यांनी संचारबंदीचे संकेत दिलेले असताना आज मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधून कोणत्या मुद्द्यांवर बोलणार, याकडे राज्याचे डोळे लागले आहेत. कोरोना प्रकोपाच्या काळात मुख्यमंत्री कोणती मोठी घोषणा करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून टाळेबंदीचे संकेत : मागिल 10 दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. माञ, लोक अजिबातच काळजी घ्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत जनतेने जर नियम पाळले नाहीत, तर कठोर पावले उचलावी लागतील. प्रसंगी नाईट कर्फ्यू तसेच संचारबंदीची घोषणाही केली जाऊ शकते, असे ठाकरे सरकारमधील मंञ्याने सांगितले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close