Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

नरसी ते मुखेड रोडवर :दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक होवुन दोन तरुण ठार


नायगाव ता./ शेषेराव कंधारे


नरसी ते मुखेड रोडवरील मुगावपाटी जवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकला धडक दिल्याने यात एक जन जागीच ठार तर दुसरा नांदेड येथील रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू पावल्याची घटना दि.२३ डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील धनंज येथील गोविंद शंकर भोसले वय वर्ष १९ रा.धनज व पांडुरंग प्रकाश सुर्यवंशी वय वर्ष २४ हे दोन तरुण दि. २३ रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान शेताकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र रात्री ११:२२ वाजताच्या सुमारास मुखेड रोडवरील मुगाव पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दोन्ही युवक बेशुद्ध अवस्थेत पडले होते. या अपघाताची माहिती नायगाव पोलिसांना समजताच
पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ व हवालदार कंधारे ,एस.एस.ढगे,परगेवार,इंगोले
यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण एकाचा मृत्यू झाला होता तर दुसरा नांदेड येथे उपचार चालू असताना मृत्यू पावला असल्याची माहिती नायगाव पोलिसांनी दिली आहे. सर्वांशी मनमिळाऊ असणारे गोविंद भोसले व पांडुरंग सुर्यवंशी यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. दोन्ही युवकावर शोकाकुल वातावरणात धनज येथे आज सायंकाळी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close