Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने मंत्री दानवे , भुमरे यांच्या बंगल्यासमोर ढोल बजाव आंदोलन


औरंगाबाद mh20live Network

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे गुरुवारी सकाळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन केले.हे आंदोलन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.मराठा समाजाला राज्य सरकारने  दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगित केले. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मराठा समाजाच्या उमेदवारांना  नोकरीच्या राखीव जागापासून लागत आहे. मराठा समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे हे राज्य मागास आयोगाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. असे असताना मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काढून घेण्यात आले. आरक्षणाला मिळालेली स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा या त्यासाठी मराठासमाजाने आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. या अंतर्गत आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शिवाजीनगर परिसरातील निवासस्थान येथे  आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्या गारखेडातील निवासस्थानासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन केले. या आंदोलनात समन्वयक किरण काळे पाटील,मनोज पाटील मुरदारे, शुभम केरे ,पंढरीनाथ गोडसे ,भरत कदम ,लक्ष्मण मोटे,सतीश बचाटे, आप्पासाहेब जाधव यांच्यासह आदींचा सहभाग  होता. आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस उपायुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळुंखे ,पोलीस निरीक्षक संतोष पाटील,सहाय्यक निरीक्षक श्रध्दा वायदंडे ,सपोनि  सुनील कराळे , उपनिरीक्षक भरत पाचोळे ,विजय पवार ,प्रभाकर सोनवणे , विनायक कापसे, वाघ ,  यांच्यासह मोठा तैनात करण्यात आला होता.


सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढुन मराठा युवकांना न्याय द्यावा.पोलीस भरती होत असल्यामुळे आमचे विद्यार्थी त्यापासुन वंचित राहत आहे.त्यामुळे पोलीस भरतीला स्थगिती देण्यात यावी.मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत.प्रकरण घटनापिठाकडे वर्ग केले.या स्थितीमुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण व नौकर्यांमध्ये आर्थिक – सामाजिक मागास प्रवर्गात आरक्षण मिळणार नसल्याने मराठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सरकारने येत्या आठ दिवसात मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढावा आज शांततेत ढोल बजाव आंदोलन केले यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने राज्यभर तिव्र आंदोलन केले जाईल.

                    किरण काळे पाटील
            समन्वयक,मराठा क्रांती ठोक मोर्चा

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close