Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापुरुषांच्या पुतळा परिसराची स्वच्छता करून अभिवादन

औरंगाबाद | दि. १४ | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत असून यानिमित्ताने यंदाची ही शिवजयंती आरोग्याचा संकल्प करून साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंती निमित्त समाजाभिमुख उपक्रमाअंतर्गत औरंगाबाद शहरात विविध भागात असलेल्या महापुरुषांच्या पुतळा परिसराची स्वच्छता करून अभिवादन करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी रविवारी (दि.१४) दिली.

औरंगाबाद-संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात स्वच्छता अभियानाप्रसंगी महोत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, कार्याध्यक्ष मनोज पाटील, भाऊसाहेब जगताप, अनिल बोरसे, संतोष कावळे यांच्यासह कल्याण चव्हाण, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, कमलाकर जगताप, बाबासाहेब डांगे, पप्पुराज ठुबे, प्रकाश सानप, किशोर ठुबे, के. के. पाटील, अंकुश कावळे, विकास शिंदे, आर. आर. मुळे, संदीप सुलताने, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे प्रशांत जगताप, सिताराम मोरे, रवींद्र राजे बोचरे, लालचंद यादव, गोविंद शोत्रिय, बाबुराव खरात,शिवाजी शिंदे बी.पी.कुलकर्णी, चरण तिवारी, दिलीप डाखोळे, आदींनी यावेळी पुतळा स्वच्छ करून महापुरुषांना अभिवादन केले.

औरंगाबाद-संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. या स्वच्छता अभियानात सिडको चौकातील हरित क्रांती चे प्रणेते वसंतराव नाईक यांचा पुतळा, अमरप्रीत चौकातील शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे पुतळा, समर्थ नगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, पैठण गेट येथील लोकमान्य टिळक पुतळा, औरंगपुऱ्यातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा, मिलकॉर्नर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा, भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिटी चौक येथील अनंत कान्हेरे पुतळा, शहागंज येथील महात्मा गांधी पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, व एन-७ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी महानगर पालिकेचे घनकचरा प्रमुख नंदकुमार भोंबे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव, सुनील दाभाडे, विशाल खरात यांनी पुळ्याची स्वच्छता केली. तर चिकलठाणा अग्निशमन विभागाचे जवान अनिल नागरे, फायरमन पंकज भालेकर, भगवान शिंदे, दीपक लव्हाळे, नदीम शेख, वाहन चालक मिनिनाथ झाडे यांनी सहकार्य केले.

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी अत्यंत आगळ्यावेगळ्या समाजाभिमुख अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने शिवजयंतीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करून आरोग्याचा संकल्प करत ही शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. देशभरातील आणि राज्यातील कोरोना संसर्गा बाबत निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता

पान- २

औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दक्षता घेण्यासाठी, विविध आरोग्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे महोत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी स्पष्ट केले.

शिवजयंती निमित्त १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान शहरातील विविध शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना १७ व १८ फेब्रुवारी रोजी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर रविवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करून अभिवादन करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी वेरूळ येथील मालोजी राजे गढी या परिसरात स्वच्छता अभियान राबवून ध्वजारोहण केल्यानंतर छत्रपती शहाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर शुक्रवार, दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक व ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तर दुपारी ४ वाजता शहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती येथे श्रीची आरती झाल्यानंतर शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होईल. राजाबाजार, गांधीपुतळा, सिटी चौक मार्गे गुलमंडी, पैठण गेट मार्गे क्रांती चौक येथे या मुख्य मिरवणुकीचा समारोप होईल. या मिरवणुकीत आजी-माजी राज्यमंत्री, खासदार, आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह शिवप्रेमी सहभागी होतील अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्यात जिल्ह्यातील शिवप्रेमींनी शासन नियमांचे पालन करत, मास्क लावून आणि सोशल डिस्टनसिंग ठेवत सहभागी व्हावे असे आवाहन औरंगाबाद-संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, कार्याध्यक्ष मनोज पाटील, भाऊसाहेब जगताप संतोष कावळे यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close