Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

पिक कर्ज व पिक विमा साठी जुना सातबाराची आवश्यकता नाही – तहसीलदार वारकड

           कन्नड : पिक विमा व  पिक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तहसील कार्यालय मध्ये व बँकेमध्ये गर्दी होत आहे. तेव्हा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा व पिक कर्ज घेण्यासाठी जुन्या सातबाराची तसेच फेरफार नककलची आवश्यकता नाही तरी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात गर्दी करु नये असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे.  दिनांक १८ जून  रोजी तहसीलदार श्री संजय वारकड यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या दालनात बैठक घेण्यात आली . या बैठकीत सर्व बँक व्यवस्थापक यांना सूचित करण्यात आलेली आहे की पिक विमा व पीक कर्ज घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला जुना सातबारा फेरफार नक्कल मागू नये ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज काढायचे आहे व पीक विमा उतरवायचा आहे त्यांनी संबंधित बँकेमध्ये फक्त चालू सातबारा व आठ अ चा उतारा व पिक विमा काढताना सेल्फ डीक्लरेशन द्यायचे आहे. त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये येऊन जुने सातबारा व फेरफार नकले ची आवश्यकता राहणार नाही .या बैठकीत असेही सूचित करण्यात आलेली आहे की शक्यतो पीक कर्ज शेतकऱ्यांना देताना बँकेमध्ये शेतकऱ्यांना येण्याची आवश्यकता पडणार नाही, शेतकरी येण्यापूर्वीच कागदपत्रे तपासून त्यांना तातडीने कर्ज मंजूर करावे. चालू सातबारा व आठ च्या प्रती आपल्या गावांमध्ये आपल्या संबंधित तलाठी यांच्याकडून आपल्याला घ्यावयाच्या आहेत . त्यासाठी विनाकारण आपण गर्दी करू नये असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. अगदी गरज पडलीच तर शेतकऱ्यांनी  विविध बँकेत कार्यालय जाताना  तोंडाला मास्क  लावून  जावे. या बैठकीस अर्चना वाडेकर सहाय्यक निबंधक, तालुका कृषी अधिकारी  बाळराजे मुळीक व₹, सहाय्यक गटविकास अधिकारी मोरे मॅडम, तालुका समन्वयक जिल्हा मध्यवर्ती बँक  सोनवणे यांच्या सह बँक अधिकारी बैठकीस हजर होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close