Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पैठण संतपिठात ग्रामपंचायत निवडणुक मतमोजणी साठी अधिकारी,कर्मचारी सज्ज पोलीसांचा तगडा बंदोबस्त


पैठण / किरण काळे

पैठण तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीसाठी दि.१८ जानेवारी  रोजी सकाळी आठ वाजता प्रशासकीय इमारत संतपीठ उद्यान रोड पैठण येथे मतमोजणी होणार असुन निवडणूक मतमोजणीचेकामकाज अतिशय काळजीपुर्वक बिनचुक व कालमर्यादीत पार पाडावी यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी ,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, झोनल अधिकारी,मास्टर ट्रेनर व शिपाई,कोतवाल यांची नेमणुक करण्यात आली आहे.इत्यादींचे मतमोजणीचे प्रशिक्षण बैठक होणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली असुन पैठण शहरातील संतपिठात ग्रामपंचायत निवडणुक मतमोजणी साठी अधिकारी,कर्मचारी सज्ज असल्याचेही तहसिलदार शेळके यांनी सांगितले.याप्रमाणे आज सकाळी आठ वाजल्यापासून तीस टेबलवर एकूण दहा ते बारा फेऱ्या होणार असुन यासाठी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणीसाठी संतपीठ येथे प्रवेश मिळेल.सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत संबंधित उमेदवार किंवा प्रतिनिधी यांना उद्या दि.१७ रोजी पासेस देण्यात येणार आहे.विनापास किंवा विना मास्क कोणालाही मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रवेश दिला जाणार नाही.असे ही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close