Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

पळसखेडा पिंपळे येथील शेतकरी कुटूंबाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांत्वन


कुटूंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घ्या – पालकमंत्री टोपे


जालना – भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील तीन शेतकऱ्यांचा वीजेचा धक्का लागुन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता. मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन करत कुटूंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील जाधव कुटूंबातील तीन शेतकऱ्यांचा वीजेचा शॉक लागल्याने विहिरीत पडुन मृत्यू झाला असुन घडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी आहे. या प्रकरणाची चौकशी अत्यंत बारकाईने करण्याबरोबरच केमिकल ॲनॅलिसीसचा अहवाल तातडीने पाठविण्यात यावा. जाधव कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेबरोबरच शासनाच्या ईतर योजनांच्या माध्यमातुन मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे सांगत भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबरच या गावाला वीजेचा सुरळीतपणे वीज पुरवठा होण्यासाठी विद्युत विभागाला निर्देश देण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबलु चौधरी, रमेश सपकाळ, कैलास पुंताळे, सखाराम माने, अण्णासाहेब भालेराव, अरविंद थोटे यांच्यासह विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांची उपस्थिती होती

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close