Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

आता फक्त केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा; करोना लसीबाबत टोपेंचे मोठे विधान

जालना: ‘करोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी कोल्डचेन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सर्व कामे पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि भारताचे औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहतोय’, असे महत्त्वाचे विधान आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. जालना येथे टोपे पत्रकारांशी बोलत होते.देशातील पाच औषध कंपन्या करोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्याचे काम करत आहेत. यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये उत्पादित झालेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची भारतात साडेबारा हजार लोकांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे तर संपूर्ण जगात साधारण पस्तीस हजार लोकांवर या लसीच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. मी स्वतः सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली आहे, असेही टोपे यांनी यावेळी नमूद केले.

जालना येथे पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. एरव्ही तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरं झाली नाही. परिणामी रक्तसाठ्यावर परिणाम झाला. आता आपल्याकडे केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उरला आहेस, असं टोपे म्हणाले.

पवारांच्या वाढदिवशी रक्तदान करा
येत्या 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तरुण वर्गाने पुढे येऊन रक्तदान करावं. त्यामुळे रक्तसाठ्यातील उणीव भरून काढता येईल, असं त्यांनी सांगितलं.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close