Subscribe to our Newsletter
क्राईम

कुख्यात गुन्हेगाराचा चाकुने भोसकून खुन

औरंगाबाद : क्षुल्लक वादातून शिवीगाळ करताच 35 सेकंदाच्या बाचाबाचीतून तिघांनी चाकुहल्ला करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या केली. चाकुचा एकच वार त्याच्या जीवावर बेतला. थेट डाव्या बाजूच्या जांघेत चाकु खुपसल्यामुळे गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दि.14 रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास औरंगपुर्‍यातील पिया मार्केटमध्ये घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हेगार चिराग राजपाल बिडला (19, रा. गांधीनगर) याच्यासह दोन अल्पवयीन बालकांना पहाटे ताब्यात घेतले. चौकशीअंती बिडला याला अटक करण्यात आली. समीर खान सिकंदर खान (27, रा. टाऊन हॉल, आसेफिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे.
चिश्तिया कॉलनीतील चालक मोहंमद आदिल मोहंमद आरेफ (28, रा. चिश्तिया कॉलनी, एन-6, सिडको) हा गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान मित्र शोएब (रा. रहेमानिया कॉलनी) याला घेऊन दुचाकीने समीर खानच्या घरी गेला. तेथून तिघेही दुचाकीने सायंकाळी पाचच्या सुमारास हिमायतबागेत गेले. तेथे गप्पा मारल्यानंतर पुन्हा समीरच्या घरी येऊन शोएबला तेथे सोडले. त्यावेळी समीरने आपण हॉटेलमधून बियर घेऊन येऊ असे म्हटल्यामुळे दोघेही बुढीलेन येथे आले. त्यावेळी समीर खान एकाला भेटून आला. पुढे दोघेही बुलेटने औरंगपुरा भाजी मंडई येथे रात्री दहा ते सव्वादहाच्या सुमारास गेले. पिया मार्केटमधील बियर शॉपीसमोर दुचाकी उभी केली. त्यानंतर दोघेही पहिल्या मजल्यावरील बियर शॉपीकडे गेले. मात्र, ती बंद असल्याने दोघेही खाली येऊन उभे राहिले. त्याचवेळी चिराग व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार असे आपसात बोलत उभे होते. तेवढ्यात एकाने समीरला शिवीगाळ करुन इकडे का आला असे म्हणाला. त्यावर मोहंमदने तू दारु पिलेला आहे. इथून निघून जा असे सांगितले. त्यावर त्याने मोहंमदच्या कानशिलात लगावली. म्हणून समीर खानने मध्यस्थीचा प्रयत्न केला. तेवढ्यातच एकाने समीरच्या गुप्तांगाजवळ चाकुने वार केला. त्यामुळे समीर जमिनीवर कोसळला. अति रक्तस्त्राव होत असल्याने समीरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिघांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close