Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

घासून नाय, तर विरोधकांची ठासून”! मनसेनं ‘या’ ग्रामपंचायतींवर फडकावला विजयाचा झेंडा

मुंबई : राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली होती. निवडणूक निकालात इतर पक्षांची घौडदौड सुरू असताना मनसेला दिलासा देणारे निकाल समोर आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

या निवडणुकीत मनसेनं शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारत विजय संपादित केला आहे. काकोळी ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली. यात मनसेनं युतीच्या उमेदवारांचा पराभव करत ग्रामपंचायतीवर कब्जा केला. ग्रामपंचायतीत मनसेचा नगरसेवक विराजमान होणार असून, ७ पैकी ४ जागा पक्षानं जिंकल्या आहेत.

सर्व विजयी उमेदवारांचं पक्षाच्यावतीनं अभिनंदनही करण्यात आलं आहे. आपले ‘मनसे’ अभिनंदन! घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतमधील ७ पैकी ४ सदस्य विजयी!- अशा शब्दात मनसेनं नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close