Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

आरटीई परतावा मिळाल्या शिवाय आरटीई प्रवेश नाही ; इंग्रजी माध्यमांच्या शाळा आर्थिक संकटात

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

नागपूर mh20live Network

भंडारा- कोविड-१९ च्या प्रादुर्भावा सोबत शिक्षण खात्याच्या सुल्तानी वटहुकूमाने सर्व इंग्रजी शाळा संस्था संचालक, शिक्षक व विद्यार्थी भरडले जात आहेत. दर दिवशी येणाऱ्या राजकीय विधानाने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र गोंधळलेल्या स्थितीत आहे. एकतर्फी निर्णय घेण्याचा धोरणाचा फटका राज्यातील इंग्रजी माध्यम शाळांना बसला आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा आर्थिक गर्तेत सापडली आहेत. राज्यात आरटीई अंतर्गत लाखो विध्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. पण शासनाने २०१७ पासून राज्यातील इंग्रजी शाळांचे हक्काचे आरटीई प्रतिपूर्तीचा परतावा केला नाही. मार्च महिन्यापासून शाळांचे आर्थिक येणे बंद असल्याने शाळेचे खर्च चालवणे कठीण आहे. यामुळे आरटीई चा परतावा मिळाल्या शिवाय आरटीई प्रवेश देणार नसल्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) जाहीर केला आहे. याबाबद मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष बाब म्हणजे शासना कडून इंग्रजी माध्यम शाळांना कवडीचे ही अनुदान मिळत नाही. इंग्रजी माध्यम शाळांनी स्वतःच्या भरवश्यावर शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे. शासनाकडून अनुदान मिळत नसल्यावर ही उत्कृष्ट सुविधा आणि दर्जेदार शिक्षण देण्याचे काम इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून अनेक वर्षापासून सुरु आहे. पण सरकारचे बदलते धोरण आणि शिक्षण विभागाकडून मिळणारी वागणूक हे गुन्हेगारांना मिळणा-या वागणुकीपेक्षा वाईट आहे. यावर शासनाने गांभीर्याने विचार करून हक्काचे परतावा तात्काळ द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात १०७ इंग्रजी माध्यम शाळा आहेत. मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून फी स्वरूपात येणारी आवक बंद आहे. आरटीई अंतर्गत प्रत्येक शाळेत जवळपास १०० च्यावर विध्यार्थी शिक्षण घेतात आहेत. नव्याने सुरु झालेल्या अनेक शाळेची पटसंख्या नुसार अर्ध्यापेक्षा जास्त विध्यार्थी आरटीईचे आहेत. २०१७ पासून आरटीई चे प्रतिपूर्ती थकीत आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील ५० टक्के, २०१८-१९ प्रतिपुर्ती ६६ टक्के व २०१९-२० आणि २०२०-२१ चे १०० टक्के प्रतिपूर्ती थकीत आहे. चालू शैक्षणिक वर्षाची प्रतिपुर्ती सोडली तरी शासनाकडे प्रत्येक शाळांची २१६ टक्के प्रतिपूर्ती रक्कम थकीत आहे. आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रतिपूर्ती अदा करावी अशी मागणी तीन महिन्यापासून सुरु आहे. पण शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने टोकाची भूमिका घेतल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
राज्यातील प्रत्येक शाळेची मागिल वर्षीची ३० ते ४० टक्के फी पालकांकडे थकित आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळांनी पालकांना कोणत्याही प्रकारची फि ची मागणी केली नाही. याउलट शाळा सुरु करण्याच्या आदेशाची वाट पहात आहेत. पण शाळा सुरु करण्याबाबतची निर्णय दिवसागणिक बदलत असल्याने राज्यात गोंधळ निर्माण झाला आहे. सरकार ने शाळा धोरण ठरवताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. अशा अनेक गंभीर समस्यांना इंग्रजी माध्यम शाळा सामोरे जात आहेत. परिस्थिती आता हाताबाहेर जात असून यामुळे इंग्रजी शाळा संस्था चालक व शिक्षक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा) संघटनेने इंग्रजी शाळा संस्थाचालकांची राज्यस्तरीय वेबीनार मिटींग घेऊन त्यात सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले. जिल्हा स्तरावर आयोजित सभेत या ठरावाला जाहीर समर्थन देण्यात आले आहे. यावेळी सभेला मेस्टाचे जिल्हा अध्यक्ष तथागत मेश्राम, उपाध्यक्ष शत्रुघ्न भांडारकर, महासचिव नरेंद्र निमकर, कोषाध्यक्ष राकेश गजभिये, उपाध्यक्ष किशोर पेठकर, युवराज डोहळे, शिवशंकर दुरूगकर, सुनीत कुमार दुबे, आशिष बडगे, के. एम. कुर्वे, सुषमा वंजारी, योगेश्वर खैरे, विनोद चापले, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक संस्था संचालक उपस्थित होते.
विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना मेल करण्यात आले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close