Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

शनिवार-रविवार लाड नाही, वीकेंडला सक्तीने लॉकडाऊन, पंजाब सरकारचा मोठा निर्णय

चंदीगड : देशभरात लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे देशातील अनेक राज्यांची स्थिती वाईट होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कोराना संसर्ग रोखण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. यानुसार आता पंजाबमध्ये वीकेंडच्या दिवशी कठोर नियमांचं पालन करावं लागणार आहे पंजाब सरकारने साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केवळ आवश्यक वस्तूंची दुकानं खुली करण्यास परवानगी दिली आहे. तसेच दूसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर देखील प्रतिबंध लावले आहेत. ज्यांच्याकडे प्रवेश पास असेल अशाच लोकांना प्रवेश दिला जाईल.

वीकेंडच्या दिवशी केवळ मेडिकल स्टोअर आणि अत्याआवश्यक सेवेतील लोकांनाच बाहेर पडण्यास परवानगी असेल. अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी (12 जून) अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी महत्त्वाची बैठक घेतली. यात राज्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर पंजाब सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यानुसार साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टी या दिवशी अंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत. ई-पास असणाऱ्यांनाच परवानगी दिली जाईल.

https://twitter.com/capt_amarinder/status/1271438975475912706/photo/1

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close