Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ, कन्फ्युजन नको, योग्य तारीख जाणून घ्या

नवी दिल्ली | आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आयटीआर रिटर्न फायलिंगना मुदतवाढीचा मागणी केंद्र सरकारकडे होत होती.

केंद्र सरकारने या मागणीला दाद देत मुदतवाढ दिला आहे. केंद्र सरकारने 12 दिवसांची मुदतवाढ दिली असून 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भात घोषणा केली आहे. ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना आणि त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. त्यासोबतच जीएसटी भरण्यासही 28 फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, 31 जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र यंदा कोरानाच्या पार्श्वभूमीवर दोनवेळा ही मुदत वाढवून देण्यात आली होती. यामध्ये 31 जुलैनंतर 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. त्यात आणखी एक महिन्याची वाढ करून 31 डिसेंबरपर्यंत वाढ करून देण्यात आली होती.

वाढवलेल्या मुदतीचा कोणाला होणार फायदा
पगारदार वर्गासाठी आयटीआर दाखल करण्याचा कालावधी 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला.
त्याचे आयटीआर फायलिंग 31 डिसेंबर रोजी कालबाह्य झाले.
1 लाख रुपयांपर्यंतच्या कर देयकाच्या स्व-मूल्यांकनाचा कालावधी वाढला.
आयटीआर स्वत: च्या आकलन प्रकरणात 15 फेब्रुवारीपर्यंत सूट देण्यात आली.
त्यांच्या बाबतीत खात्यांचे ऑडिट शिल्लकही वाढले आहे.
आता आंतरराष्ट्रीय व्यवहार असलेल्या खात्यांमध्ये अधिक वेळ लागणार.
अशा परिस्थितीत, देय तारीख 31 जानेवारी होती, जी आता 15 फेब्रुवारीपर्यंत असेल.

https://twitter.com/ANI?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1344265776753098753%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fbusiness%2Fincome-tax-returns-date
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close