Subscribe to our Newsletter
Loading
Uncategorized

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन

ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

   सोयगाव:   ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची भूमिका ठाम असल्याने  पूर्वी जी कामे केली होती त्यापेक्षाही जास्त लोकांची कामे करा. कारण सर्वसामान्यांना तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. गावातील मूलभूत गरजा पूर्ण करून गाव हागणदारी मुक्त करा. सरकारच्या योजनेचा लाभ गावातील सर्व सामान्यांना मिळवून द्या. राज्यातील सरकार हे माझे सरकार आहे असे सामान्य माणसाला वाटले पाहिजे या पद्धतीने लोकांची सेवा करा यासाठी ग्रामविकास विभागाचा निधी कमी पडणार नाही असे स्पष्ट करीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्या असे अवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी (ता.२२)शुक्रवारी सोयगाव येथे विजयी उमेदवारांना केले.
   शुक्रवार ( ता.२२) रोजी सोयगाव येथील शिवसेना भवन परिसरात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील शिवनेनेच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असतांना ना. अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी  शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, तालुका संघटक दिलीप मचे, डॉ.मंचिंद्र पाखरे, बांधकाम सभापती कीशोर बलांडे, शहरप्रमुख संतोष बोडखे, उस्मान पठाण, माजी शहरप्रमुख गजानन चौधरी, शिवाप्पा चोपडे, धरमसिंग चव्हाण,कृष्णा राऊत,  रमेश गव्हांडे, योगेश पाटील, दिलीप देसाई,  समाधान तायडे,  राजमल पवार, राधेश्याम जाधव, कृपालसिंग बातळे, दारासिंग चव्हाण, श्रीराम चौधरी, शरीफ शहा, शेख रउफ, महेश चौधरी, विक्रम चौधरी, दत्तू इंगळे, फेरोज पठाण, रशीद पठाण, डॉ.देशमुख,  कुणाल राजपूत, मोतीराम पंडीत, डॉ.रघुनाथ फुसे, राजेंद्र गव्हाड, संजय आगे, नथ्थु पाटील, आनंदा ढगे, अमोल मापारी, अरुण वाघ, शेख मुनाफ,अनिल इंगळे, हर्षल देशमुख,जीवन पाटील,योगेश नागपुरे, बाबू चव्हाण,  विठ्ठल राठोड, प्रताप राठोड, समाधान काळे, भगवान टोकरे, भगवान वारंगने, नंदू हजारी, श्रावण राठोड, वसंत जाधव, बळीराम जाधव, सुधाकर पाटील, द्रौपताबाई सोनवणे, संध्याताई मापारी, आत्माराम गोतमारे, शेख राजू, सांडू तडवी,शेख अकिल, विनोद तेली,  आदींसह सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  पुढे बोलताना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की, विधानसभा नंतर ग्रामसभेला मोठे महत्व आहे. २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात येते मात्र अद्याप ग्रामपंचायत मध्ये सरपंचाची निवड झाली नसल्याने या निर्णयाला स्थागती देण्यात आली असून सरपंच निवडीनंतर नवीन सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात यावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आली असल्याची माहिती ना. अब्दुल सत्तार यांनी दिली. ज्या गावात ग्रामपंचायत ईमारत नाही त्यागावात नवीन सुसज्ज ग्रामपंचायत ईमारत साठी निधी देणार असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. गावातील पाणी प्रश्न आटोक्यात आणण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना गावात राबविणार असून गावातील विकासकामांसाठी ग्रामविकास विभागाचा निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही ना. अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी दिली. कोरोना  संकटातही मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सक्षमपणे सरकार चालविण्याचे काम केले. याकाळात केंद्र सरकारने जाणीवपूर्वक राज्यसरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका ना. अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close