जालना शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे आयोजन जालना । प्रतिनिधी - समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे रविवार (दि 15) रोजी जुना जालन्यातील स्व. कल्याणराव घोगरे स्टेडीयम येथे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शनिवार (दि 14) रोजी सभामंडपाचे उदघाटन राष्ट्रवादीचे नेते शरद टोपे, डिवायएसपी निरज राजगुरू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इकबाल पाशा, माजी आमदार अरविंद चव्हाण, जालना शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, माजी नगराध्यक्ष बबलु चौधरी, ज्येष्ठ नेते अब्दुल रशिद, जिल्हा नियोजन समिती सदस्य रविंद्र तौर, माजी नगरसेवक संजय दाड, माजी नगरसेवक जयंत भोसले, जालना शहर पक्ष निरीक्षक सुधाकर निकाळजे, ज्येष्ठ नेते संजय इंगळे, कुस्तगीर परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष दयानंद भक्त, जेपीसी बँकेचे चेअरमन दीपक भुरेवाल, माजी नगरसेवक अनवर मिर्झा, समाजसेवक सय्यद रहिम, मराठवाडा महिला अध्यक्ष शेख साजिया, माजी नगरसेवक मनकर्णाताई डांगे, शहराध्यक्ष रा.युवती कॉग्रेस शितल बरोटे, जिल्हाध्यक्ष कामगार सेल रेखाताई तौर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास जालनेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले आहे. स्व. शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या स्मरणार्थ समाज प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन रविवार (दि 15) रोजी सायं 5 वा.30 मि. आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री व जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे राहणार आहेत. तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, एकबाल पाशा, अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, बबलु चौधरी, रशिद पहेलवान, सुधाकर निकाळजे, शाह आलम खान, दयानंद भक्त, रविंद्र तौर, मनोज मरकड, जगन्नाथ काकडे, सतीश टोपे, दीपक भुरेवाल, संजय दाड, सुरेश खंडाळे, पंकज बोराडे, कपिल आकात, संजय काळबांडे, संजय इंगळे, सुरेखाताई लहाने, विश्वंभर भुतेकर, जयाजी देशमुख, आमेर पाशा, शेख साजिया, अकबर खॉ बने खॉ, संग्राम राजे देशमुख, दिलीप भुतेकर, बाळासाहेब तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा जालनेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जालना शहर अध्यक्ष प्रा. राजेंद्र साहेबराव जाधव यांनी केले आहे.