Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध
18 मे रोजी घेणार शपथ?


मुंबई /mh20live Network

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मुख्यमंत्री उमेदवार असलेली निवडणूक बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. त्यानुसार सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संख्याबळानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. या सर्वांचा शपथविधी आता सोमवारी 18 मे रोजी होणार आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधानपरिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत.
विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीतील पेच काँग्रेसच्या भूमिकेने संपला होता. काँग्रेसने सहाव्या जागेसाठी आग्रह सोडत माघार घेतल्याने आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतः महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे 5 उमेदवार आणि भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याचं स्पष्ट झालं.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close