Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

‘यूपीएससी’च्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर; ‘एमपीएससी’ धडा घेणार का?

mh20live Newtork

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरविण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.
कोरोना संकटामुळे स्थगित झालेल्या यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठीचे नवे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले आहे. 2020 वर्षात होणाऱ्या परीक्षांसाठी हे नवे वेळापत्रक यूपीएससीच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. सिव्हिल सर्व्हिसेस पूर्वपरीक्षा जी आधी 31 मे रोजी नियोजित होती, ती लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. शिवाय 2019 च्या परीक्षेमध्ये मुलाखतीचा टप्पा कोरोनामुळे अपूर्ण राहिला होता. ज्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या, त्या 20 जुलैपासून सुरू होणार आहेत. त्याबाबत उमेदवारांना वैयक्तिक पत्राद्वारे तारीख कळवली जाईल. एनडीएची परीक्षा 10 जून रोजी होणार आहे. यूपीएससीच्या वर्षभराच्या परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर होत असते. यावेळी कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. पण आज आयोगाने हे नवे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. अर्थात परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली तर या परीक्षांच्या तारखेत थोडाफार बदल होऊ शकतो, असेही आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्रात एमपीएससीच्या काही परीक्षांच्या निकालाबद्दल, तारखेबद्दल अजून संभ्रम आहे. त्यामुळे आता यूपीएससीने विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी केल्यानंतर एमपीएसीकडूनही वेळीच निकाल आणि नव्या तारखा जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close